श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न: रासेयो व एन.सी.सी.चा संयुक्त उपक्रम
अंजनगाव सुर्जी: मनोहर मुरकुटे
रक्तदान हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून रक्त मिळाल्याने रुग्णांचे प्राण वाचतात. सोबतच रक्तदात्याच्या आरोग्यालाही फायदा होतो. रक्तदानामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलोरीज ज्वलनास मदत होते. तसेच रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो. देशात १३० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असूनही रक्त संकलन अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. राज्यातील रूग्णालयांमध्ये तसेच रक्तपेढींमध्ये रक्ताची टंचाई भासू नये या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.), रेड रिबल क्लब व उन्नत भारत अभियान पथक यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी येथे राष्ट्रीय युवा दिवस (स्वामी विवेकांनद जयंती) तसेच राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबिरास एकनिल रक्त पेढी यांनी रक्त संकलनाकरिता सहकार्य केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वामी विवेकांनद व राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्य त्यांना अभिवादन करून रक्तदान शिबीराचे उदघाटन प्रा.डॉ.बशिष्ठ चौबे यांच्या उपस्थितीत प्रा.डॉ.बिना राठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दत्त मनवतकर, श्री. सागर तोडकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन घोडीले, डॉ. ममता येवतकर, डॉ. नविता मालाणी (समन्वयक, रेड रिबल क्लब), डॉ. अनिकेत भुयार (समन्वयक, उन्नत भारत अभियान) व एन.सी.सी. ऑफिसर प्रा. रामचंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. शिबीरादरम्यान खिरगव्हाण, समशेरपूर, निंभारी, मुऱ्हा, कुंभारगाव तसेच अंजनगाव परिसरातील नागरिकांचा विशेष सहभाग लाभला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता एकनिल रक्त पेढी तर्फे रोहित मेश्राम, मिलिंद भितकर, आकाश थूल, नेहा वाटकर, अश्विनी पांडे, राहुल भोयर, शोएब शेख यांचा तर महाविद्यालातील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी डॉ. मंगेश डगवाल, डॉ. नितीन सराफ, डॉ. सत्येंद्र गडपायले, डॉ. महेंद्र गिरी, दिलीप सोळंके व नितीन गोमाशे तसेच रासेयो स्वयंसेवक ऋतुजा पखान, तनया खरड, प्रणाली डाहे, साक्षी ढवळे व कृष्णा बनसोड आदींचे सहकार्य लाभले.