हितेश कांकरिया यांच्या दीक्षा निमित्ताने सत्कार समारंभ, रथातून मिरवणूक, जैन समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित.

नेर :- नवनाथ दरोई
नेर येथील महावीर भवनात जैन समाजाचे हितेश कांकरीया यांनी दीक्षा घेतली असल्याने त्यांचा अभिनंदन सत्कार सोहळा महावीर भवनात घेण्यात आला. या सत्कार सोहळ्यानिमित्त नेर शहरातील महावीर भवना पासून तर नेर शहरातील तेलीपूरा,मारवाडी चौक, नेर पोलीस स्टेशन, नेर नगर परिषद कार्यालय, सराफा लाईन,बारीपुरा या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. रथामध्ये हितेश कांगरिया यांना बसवण्यात आले. हितेश कांकरिया हा कॉम्प्युटर इंजिनियर असून ते पुण्यात नोकरीला होता. नोकरीला असताना पुणा येथील गुरु महाराजाचे प्रवचनात गेला असता त्यांचे त्या गुरु महाराजांच्या प्रवचनाने मत परिवर्तन झाले. त्यामुळे त्यांनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दीक्षा घेण्याचा निर्णर्यामुळे त्यांचा नेर येथील महावीर भवनात त्यांना शाळा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर हितेश हा रामलालजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेईल. दिक्षा नंतर ते त्याच्या घराचा त्याग करेल. व समाजासाठी काम करेल. कार्यक्रमाचे आयोजन संदीप लोढा व जितेंद्र लुकड यांनी केले. लोढा परिवाराचे समाजाने अभिनंदन केले.