सामाजिक

आर्वी येथे श्री संत शिरोमणी संताजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्सव साजरा

Spread the love

आर्वी ,प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 399 वी जयंती रघुनाथ महाराज देवस्थान मारुती वार्ड आर्वी येथे ८ डिसेंबर रोज शुक्रवारला सर्व समाज बांधवांच्या उपस्थिती साजरी करण्यात आली असून यावेळी
डाॅ.वंसतराव गुल्हाने, माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करून भजन संध्या व काल्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी संजयजी अजमिरे,अशोक जिरापुरे,सतीश शिरभाते,श्रीमती लताताई तळेकर विजय भाऊ अजमीरे प्रकाश गुल्हाने अविनाश टाके,सुरेंद्र गोठाणे,अनिल गुल्हाने अरुण कहारे,प्रकाशराव जैयसिगपुरे,जगणराव गाठे, नाना असोले रवी गोडबोले व आर्वीकर तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मनोज गोडबोले यांनी केले सदर कार्यक्रमाला महिला व समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता
श्री.संताजी महाराज जन्मोत्सव सोहळा नवयुवक समिती मार्फत तीन दिवस चालणार असून या निमित्य शनिवार दिनांक नऊ ला सकाळी रांगोळी स्पर्धा व दुपारी चार वाजता ह भ प बाल कीर्तनकार माऊली महाराज जाहूरकर झी टॉकीज फेम यांचा बहरदार सुमधुर कीर्तनाचा कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालय आर्वी येथे संपन्न होणार आहे तसेच दिनांक १० रविवारला सकाळी नऊ वाजता पुष्परचना स्पर्धा व दुपारी बारा वाजता माननीय श्री अनिल भाऊ बजाईत समाज प्रबोधनकार नागपूर यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे यानंतर बक्षीस वितरण समारंभ व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल असे श्री संताजी महाराज जन्मोत्सव समितीचे आयोजक राजेश गुल्हाणे,बंटी गोडबोले,अतुल जैयसिंगपुरे,विशु आगलावे, संजय चिदेकरजी,भरत जैयसिगपुरे मनोज गोडबोले जगदीश पडोळे पवन पडोळे अभिजित भिवगडे शैलेश काळमोरे आकाश कळंबे मनोज पाटील आकाश कळंबे मनोज पाटील निखिल भिवगडे कुंदन चकोले देवा सातपुते गौरव निखाडे यानी या कार्यक्रमाला सर्व तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close