हटके
पत्नीने रागाने पतीला लगावला ठोसा आणि पतीच्या जीवाला उद्भवला धोका

ढाई किलो का हाथ किसी पर पड जाए तो वह उठता नही उठ जाता है चा आला अनुभव
पुणे / नवप्रहार मीडिया
पती पत्नीत वाद ही काही नवीन गोष्ट नाही. पतीने पत्नीचा दागिने आणि साडी किंवा अन्य वस्तूंचा हट्ट पुरवला नाही तर त्यांच्यात वादविवाद होतात. पण पुण्यातील एका पत्नीने पतीने तिला वाढदिवसाच्या दिवशी दुबईला नेले नाही म्हणून ठोसा लगावला त्यात पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. झोप मोड झाल्याने भाडेकरूने मालकाची हत्या केल्याचा प्रकार शहरातील हडपसर परिसरात घडला होता. त्यामुळे पुण्यात नेमक चाललय तरी काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यातील वानवडी परिसरात खळबजनक घटना घडली. पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादातून पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून केला. ही घटना दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत घडली आहे. निखील पुष्पराज खन्ना (वय-36) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते बांधकाम व्यावसायिक होते. याप्रकरणी रेणुका निखील खन्ना (वय-38 रा. वानवडी) यांना वानवडी पोलिसांनी चौकशी करुन ताब्यात घेतलं आहे. पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे सध्या मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
घरगुती भांडणातून झालेल्या वादातून रेणुका यांनी पती निखील यांच्या तोंडावर ठोसा मारला. यानंतर सासरे डॉ. खन्ना यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घरी आले. त्यांनी निखील यांना तपासून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी याबाबत वानवडी पोलिसांना कळवलं.
मयत निखील पुष्कराज खन्ना हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांच्या घरी आई-वडिल,पत्नी असे चारजण राहतात. निखील आणि आरोपी पत्नी रेणुका यांचा सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता.पोलिसांनी आरोपी रेणुका यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |