नवरात्र उत्सव कार्यक्रमात नितीनजी कदम यांना पहिली पसंती
विविध नवदूर्गोत्सव कार्यक्रमामध्ये नितीनजी कदम प्राधान्य
आतापर्यंत २२८ मंडळांना दिल्या भेटी
प्रतिनिधि / अमरावती :
*स्थानिक बडनेरा शहर व ग्रामीण भागामध्ये नवरात्र उत्सवाची एकच धुन बघायला मिळत आहे. आकर्षक रोषणाई व सुंदर अश्या देखाव्यामुळे नवदूर्गोत्सव मंडळे बहरलेली दिसत आहे.गेल्या आठवड्यापूर्वी पासून मातेचे मोठ्या आतिशबाजीने आगमन झाले. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये याकरिता प्रशासन व नागरिक विशेष काळजी घेत आहेत.* *महिलांच्या या नवू दिवसांच्या पावन पर्वावर नवरात्र गरबा आयोजित करून मोठ्या भक्तीत तल्लीन होतात.*
*दरम्यान बडनेरा ग्रामीण व शहरी भागात समाजसेवी नितीनजी कदम यांनी आतापर्यंत २२८ नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देत नवा कीर्तिमानाची नोंद केली आहे. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले नितीनजी कदम यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढत चालला आहे. अश्यातच विविध नवरात्र उत्सव व गरबा मंडळात नितीनजी कदम यांना नागरिकांची पहिली पसंती म्हणून आमंत्रित करण्यात येत आहे.आयोजित कार्यक्रमामध्ये नितीनजी कदम यांना महाआर्तीचा महामान मिळत असून एक आपुलकीचे व हक्काचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जात आहे.*
*आनंद, उत्साह,आणि भक्तिभावाच्या वातावरणात दुर्गा मातेचे आगमन संपूर्ण बडनेरा शहर व ग्रामीण मध्ये झाले. चैतन्याने सळसळणारा नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी सर्व बडनेरावासी एकत्र जमत असून मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आपल्याला प्रत्येक नवदुर्गोत्सव मंडळात आपल्याला पाहावयास मिळते. माताराणीचे आगमन ही सर्वत्र आनंद आणि वातावरणात चैतन्य घेऊन येत असतो सर्वांना एकत्र घेऊन येणारा हा ऐक्याचा सण आहे.*
*दरम्यान नवरात्र उत्सवाचा हर्षोउल्हास सुरू असतांना समाजसेवी श्री. नितीनजी कदम यांनी आतापर्यंत तब्बल २२८ नवदुर्गोत्सव मंडळांना भेटी देत महाआरतीचा बहुमान स्वीकारत आपल्या माताभक्तीची प्रचिती दिली.व एवढ्या मोठ्या व्यापक स्वरूपात नवदुर्गोत्सव मंडळांना भेटी दिल्याचा किर्तीमन रचला.बडनेरा शहर व ग्रामीण भागामध्ये नितीनजी कदम यांची वाढत चाललेली लोकप्रियता व निरंतर सुरूच असलेल्या सामाजिक कार्यासाठी समाजसेवी नितीनजी कदम हे नाव आता संपूर्ण परिसरात चर्चेत असुन प्रत्येक मंडळाकडून आमत्रित करण्यात येत असुन अद्यापही ६७ मंडळे प्रतिक्षेच्या यादीत आहेत.यावरून आपल्याला नितीनजी यांची वाढत चाललेली लोकप्रियता व नागरिकांच्या मनात व्यापक स्वरूपाची आपुलकी निदर्शनास येते आहे.गेल्या १५ ऑक्टबर रोजी घटस्थापनेच्या दिवसापासून नितीनजी कदम यांनी बडनेरा शहर व ग्रामीण भागात शेतकरी-शेतमजूर-ग्रामस्थ यांच्या समस्या सोडवत आपल्या सामाजिक कार्याच्या सेवाकार्यातून वेळ घेत आपल्या दुर्गा मातेच्या दर्शनाकरिता आवर्जून वेळ काढत माताभक्तीचे उत्तम उदाहरण समाजापुढे मांडत आहेत. विविध बडनेरा शहर व ग्रामीण भागातील नवदुर्गोत्सव मंडळानी सामाजिक सेवाकार्याकरिता समाजसेवी श्री.नितीनजी कदम यांचा सत्कारदेखील केला. दरम्यान आपल संपूर्ण जीवन* *शेतकरी,मंजूर,अन्यायग्रस्त,अपंग,गोरगरीब नागरिकांच्या सेवेकरिता झटविण्याचे प्रतिपादन नितीनजी यांनी यावेळी आपल्या भाषणादरम्यान केले.आपल्या हातून अश्याच प्रकारची सामाजिक सेवा घडत राहो अश्या आशयाची प्रार्थना यावेळी नितीनजी कदम यांनी मातेचरणी केली. यावेळी नवदुर्गोत्सव मंडळांचे विश्वस्त पदाधीकारी तसेच संकल्प बहुद्देशीय संस्थेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..*