त्याने आपल्या दोन्ही पायांवर गोंदवून ठेवली होती शत्रूंची नावे
त्याने आपल्या दोन्ही पायांवर गोंदवून ठेवली होती शत्रूंची नावे
वरळी / नवप्रहार डेस्क
आपण बघितले असेल की अनेक चित्रपटात हिरो त्याच्या कुटुंबियांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो नाव लपवून शत्रूच्या टोळीत जातो. आणि मग त्यांच्यात मिसळून त्यांचे सर्व राज जमा करतो. त्याची नोंद तो एखाद्या डायरीत करतो. शत्रूला त्याच्यावर शंका आल्यावर जेव्हा ते त्याच्या जीवावर उठतात. तेव्हा तो शत्रूंचे राज असलेली डायरी कुठे आहे. आणि त्यात काय आहे हे जवळच्या व्यक्तीला सांगतो. आणि मग ती व्यक्ती ( चित्रपटात त्याला या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी दाखवतात) आपल्या पद्धतीने बदला घेतो. चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना मुंबईचे उपनगर असलेल्या वरळी येथे घडली आहे. पोलीस खबरी असलेल्या व्यक्तीने आपल्या शत्रूंची नावे आपल्या दोन्ही पायांवर लिहून ठेवली होती. आणि त्याच ठिकाणी घरात लाल डायरी आहे ती जप्त करा असे पोलिसांना उद्देशून लिहिले होते.
वरळीत ‘ सॉफ्ट टच स्पा ‘ या ठिकाणी पोलीस खबरी गुरूसिद्धप्पा वाघमारे याने आपल्या जीवनात अनेक शत्रू पाळून ठेवले होते, हे शत्रू कुठल्याही क्षणी आपला घात करतील म्हणून गुरूसिद्धप्पाने आपल्या दोन्ही पायांच्या मांडीवर २२ शत्रूच्या नावांच्या यादी टॅटू रुपात कोरून ठेवली होती.
या यादीत अटक करण्यात आलेला ‘स्वाफ्ट टच स्पा’चा मालक संतोष शेरेगर याचे देखील नाव कोरले होते. दरम्यान पोलिसांना गुरूच्या घरी तपासणी केली असता त्यात एक लाल रंगाची डायरी मिळून आली त्यात विविध स्पा मालकाकडून वसूल केलेल्या हप्त्याचा लेखाजोखा मांडला होता. वरळी पोलिसांनी या हत्येप्रकरणी संतोष शेरेगर याला अटक केली असून गुन्हे शाखेने नालासोपारा आणि राजस्थान मधील कोटा येथून तिघांना ताब्यात घेतले आहे.
आरटीआय कार्यकर्ता तसेच पोलीस खबरी असणारा गुरूसिद्धपा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची वरळीच्या सॉफ्ट टच स्पा मध्ये गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले. वरळी पोलिसांनी गुरूसिद्धपा याचा मृतदेह ताब्यात घेऊन नायर रुग्णालयात पूर्व चाचणी साठी पाठवला होता, तसेच स्पा मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणी आणि स्पा चा मालक संतोष शेरेगर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. गुरूसिद्धपा वाघमारे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना डॉक्टरांना त्याच्या दोन्ही पायांच्या मांडीवर काही नावे टॅटू रुपात कोरल्याचे आढळून आले.
डॉक्टरांनी याबाबत वरळी पोलिसांना कळवले असता पोलिसांनी तात्काळ शवविच्छेदन विभागात धाव घेतली, त्यावेळी पोलिसांनी इन्कवेस्ट पंचनामा सुरू केला. गुरुसिद्धपा याच्या दोन्ही पायाच्या मांड्यावर २२ नावाची यादी कोरली होती, तसेच एक संदेश देखील होता. ‘माझ्या दुष्मनाचे नावे डायरीत आहे, चौकशी करून कारवाई करा, असे लिहून खाली २२जणांची नावे कोरण्यात आली होती, त्यात सॉफ्ट टच स्पा चा मालक संतोष शेरेगर याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.
दरम्यान पोलिसांनी गुरूच्या घराची तपासणी केली असता त्यांना लाल रंगाची डायरी मिळून आली, त्या डायरीत गुरूने विविध स्पा मालकाकडून हप्ता वसूल केल्याचा लेखाजोखा मांडला होता.तसेच लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या पेनाचा वापर करून लाल रंगाच्या पेनाने आजचा दिवस वाईट गेला, तर हिरव्या रंगाच्या पेनाने आजचा दिवस चांगला गेला आणि निळ्या रंगाच्या पेनाने आजचा दिवस नॉर्मल गेला असे लिहून ठेवले होते.