नशामुक्त पहाट कार्यक्रम आयोजित.
पथनाट्य सादर करत जनजागृती.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
यवतमाळ पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ‘नशामुक्त पहाट’ हा अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविल्या जात असून या कार्यक्रमा अंतर्गत घाटंजी व पारवा पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्ती पहाट’ चे आयोजन बुधवार १९ .१०.२३ रोजी दोन सत्रात घेण्यात आले. पहीले सत्र सकाळी ११:०० वाजता व दुसरे सत्र १:०० वा. घाटंजीतील गिलानी कॉलेज येथे पथनाट्य पोलीस स्टेशन चौक येथे करण्यात आले.
नशामुक्त कार्यक्रमास सुरवातीला दीप प्रज्वलन करत घाटंजी तहीलदार साहेब विजय साळवे,
गिलानी कॉलेज प्रा.माहुरे, घाटंजीचे पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर,पारव्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लींगडे, यांनी केले. कार्यक्रम अध्यक्षस्थानी तहसिलदार विजय साळवे होते.नशामुक्त कार्यक्रमास उपस्थित यूवा वर्गास संबोधित करतांना तहसिलदार साळवे यांनी व्यसनाचे दूषपरिनाम विषद करत मोलिक मार्गदर्शन केले. व्यसनमुक्ती केंद्र पुणे प्रवक्ते निरज शेवाळे यांनी व्यसन मुक्त जीवन जगाण्याचे फायदे आणि त्याचा समाजमनावर होणारा सफल परिनाम यावर सखोल उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम मधल्या सत्रात मा. फुले समाज कार्य महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी घाटंजीतील पोलीस स्टेशन चौक येथे शारदा उत्सव मंडळाच्या मंचकावर “व्यसन मुक्त जीवन” आणि व्यसनामुळे कुटूंब कश्या प्रकारे उध्वस्त होते या बद्दल पथनाट्यातून व्यसने सगळी सोडून द्यावा सरळ पणाचे जिवन जगा ना! हा जनजागृतीचा संदेश दिला.यावेळी सहायक प्रा. प्रवीण इंगळे सर यांच्या मार्गदर्शन लाभले.या पथनाट्य कार्यक्रमाला पोलिस उपनरीक्षक विलास सिडाम,पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे, सह शालेय विद्यार्थि, शिक्षक, पालक,सरपंच, शासकीय अधिकारी,पोलीस पाटील, दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी तथा तालुक्यातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन मोरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी घाटंजी पोलीस स्टेशनचे वामन जाधव, विनोद मेश्राम, दिनेश जाधव,मेघाली खूपसे,कयुम कलीम,राहुल खंडागळे,राजेश्वर दाभेकर,अमित लोखंडे,नीलेश घोसे,महादेव डाखोरे,संदिप गोहने, दीपक वाकडे, धीरज मडावी, नितेश छापेकर, वीरेंद्र वाघमारे, आदींनी परिश्रम घेतले.
०००००००