पंचदिप नवदुर्गोत्सव मंडळात अध्यक्ष म्हणुन समाजसेवी नितीनजी कदम यांनी दिली भेट
शिष्टमंडळाकडून नितीनजी यांचा सामाजिक सेवाकार्याकरिता सत्कार
*नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भक्तगणांची उसळली गर्दी*
*प्रतिनीधी/अमरावती :*
*स्थानिक अमरावती शहरामधील अंबागेट परिसरातील प्रसिध्द असणाऱ्या पंचदिप नवदुर्गोत्सव मंडळात काल समाजसेवी नितीनजी कदम यांनी आपली अध्यक्षीय उपस्थिती दर्शवली. गेल्या आठवड्यापूर्वी पांचदिप नवदुर्गोत्सव मंडळांच्या पाया उद्घाटन सोहळ्याचे सदर मंडळाचे अध्यक्ष म्हणुन नितीनजी यांनी महापुजेचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवाच्या पाहिल्या दिवसाच्या निमित्ताने नितीनजी यांनी हजेरी लावत पाहिल्या आरतीचा बहुमान स्वीकारला. गेल्या काही वर्षापासून समाजसेवी नितीनजी कदम हे सदर मंडळाचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असुन अत्यंत काळजीपूर्वक नागरिकांच्या सोयीस्कर दर्शनाची व्यवस्था करीत आहे. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये याकरिता नितीनजी यांची संकल्प बहुद्देशीय संस्थेचे सदस्य विशेष काळजी घेताना दिसून येत आहेत. तसेच या मंडळाला 30 वर्ष पूर्ण झाले असुन मोठ्यप्रमाणावर नागरिक व महीला भगिनी येथिल आकर्षक रोषणाई , सुंदर देखावा व नवदूर्गेची प्रतिमा बघण्याकरिता जिल्हाभरातून येतात. त्यांचा दर्शणाकरिता विशेष काळजी नितीनजी कदम यांची संकल्प बहुद्देशीय संस्था व पांचदिप नवदुर्गोत्सव मंडळ घेतं असुन संपूर्ण शहरात नितीनजी कदम यांच्या आयोजन व्यवस्थेचे कौतुक करीत आहेत. तसेच सदर मंडळाच्या शिष्टमंडळाकळून सामाजिक कार्यासाठी नितीनजी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सवैय्या , अमर पिंपलकर, राजू राजगुरे, अमित उमरवेश अभिजित पारसकर, विजय ठाकूर, संकेत गाडगे, तुषार यावले प्रामुख्याने उपस्थीत होते. तसेच पाहिल्या आरतीच्या बहुमान व सामाजिक कार्यासाठी केलेल्या सत्कारासाठी शिष्टमंडळाचे आभार मानले.*
*********