प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया तर्फे गांधी जयंती व लालबहादूर शास्री जयंती जयस्तंभ चौकात साजरी

सध्या समाजातील वातावरण पाहता बापु तूम्ही परत या ही आर्त हाक.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपती मा. गांधीजींच्या जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महामानव यांची जयंती निमित्त घाटंजी जयस्तंभ चौक येथे प्राउटिस्ट ब्लॉक च्यावतीने समाजातील विविध क्षेत्रातील सामाजिक काम करणारे मान्यवर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम प्रास्ताविक मधूकर निस्ताणे यांनी केले या प्रसंगी आत्ताचे समाज वास्तव वातावरन पाहता जिकडे पहावे तिकडे अशांतता व क्षणीक सुखासाठी व आपले वर्चस्व कायम रहावे यासाठी लोक अशांती व वर्चस्वाला खरं समजत त्याच वातावरणात जगत आहे.वर्चस्व व व अहमभावात जगताना महात्मा गांधी यांचा ’अहिंसा परमो धर्म’ ही वास्तविक जिवन जगण्याच्या मार्गापासून भरकटत केवळ अशांत व तनआवआत जगत आहे.काहींना सोशल मिडिया वर चर्चेत राहण्याचा ही हव्यास वाढीस लागला आहे. म्हणूनचं समाजातील हे अशांती व तनावमुक्त वातावरन पाहता महात्मा गांधींच्या विचारधारेला शांती मार्गावर पुन्हा ‘बापु तूम्ही परत!’ अशी ही म्हणण्याची वेळ आली आहे. सदर अभिवादन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानी डोहाळे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनंत चौधरी,मोरेश्वर वातीले,पांडूरंग कीरनापुरे,संदीप माटे,नरेंद्र धनरे, सचिन कर्णेवार, वाढवे,अनिल ठाकरे,प्रकाश ठाकरे सह इतरही सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम संचालन मोहन पवार व आभार पांडूरंग कीरनापुरे यांनी मानले.