जिल्हा परिषद शाळा चांदूरवाडी येथे लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
चांदुर रेल्वे / अमोल ठाकरे
आधुनिक युगांमध्ये आधुनिक तिकडे वाव देऊन शाळेचाही आधुनिक विकास करण्याच्या दृष्टीने चांदुर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा चांदूरवाडी येथे कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान न घेता केवळ लोकांच्या सहभागातून शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे चांदुर रेल्वे मधील चांदूरवाडी शंभर टक्के मजुर वस्ती असलेल्या गावातील लोकांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून आपल्या पाल्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे त्यादृष्टीने शाळेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अथवा शाळेतील कोणत्याही प्रकारची तोडफोड होऊ नये या दृष्टीकरिता व शाळा सुशोभीकरणाकरिता लोकसहभागातून चार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे ठरवले व प्रत्यक्षातही उतरवले . या सीसीटीव्ही कॅमेराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी परमपूज्य मंगेश महाराज नाग मंदिर श्री क्षेत्र गव्हाळा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे सीसीटीव्ही कॅमेरा करिता शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन वावरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश खंडाते ,उपाध्यक्षा राधाताई तायडे ,लियाकत शहा , सहाय्यक शिक्षक नंदकिशोर धर्मे,अस्मिता गिरी ,चित्रा बनसोड यांनी लोकसहभागातून यथाशक्ती जवळ जवळ पंचवीस हजार रुपये जमा केले. चांदुरवाडी गावातील ग्रामस्थांनी आपल्या यथाशक्तीप्रमाणे शाळेला आर्थिक सहकार्य करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सहकार्य केले आहे आज च्या काळात स्वार्थी पणामुळे खाजगी संस्थेत चढाओढ व पैशाची ओढतोड चालू असताना गरीब मजूर वस्तीच्या गावातील लोकांनी एकत्र येऊन लोक सहभागातून जिल्हा परिषद शाळा चांदूरवाडी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे