क्राइम

पितापुत्राची गोळ्या झाडून हत्या ; दुकानावरून होता वाद

Spread the love

आझमगढ ( युपी )/ नवप्रहार मीडिया 

                     नेहमीच या ना कारणाने चर्चेत असलेले उत्तरप्रदेश बाप लेकाच्या हत्येमुळे आणखी चर्चेत आले आहे. सारदाहा मार्केटमधील एका दुकानावरून सुरू असलेला वाद हे या प्रकारणामगिल मुख्य कारण असल्याचे बोलल्या जात आहे. घटना महाराजगंज पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असुन दुकांदारांत दहशत पसरली आहे. पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली आहे.

रशीद (वय 55) आणि त्याचा मुलगा शोएब (वय 22) अशी या दोघांची नावे असून या वादातून त्यांची निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  रशीद आणि आरोपी दिनेश यांच्यात वाद झाला होता. त्या वादावरून दिनेशने दोघांवर गोळ्या झाडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

 

हा जीवघेणा हल्ला इंटरनेटवर व्हायरल होत आहे.  या फुटेजमध्ये दिनेश रशीद आणि शोएब यांच्यावर गोळीबार करत असताना हा भांडण प्राणघातक संघर्षात वाढल्याचे दृश्य दिसत आहे. दुर्दैवाने पिता-पुत्र दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आरोपी रशीदचे दुकान पेटवण्याचा प्रयत्न करताना, वेगवेगळ्या रॅकवर ठेवलेल्या कपड्यांचे बंडल पेटवताना दिसतात. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.परिसरातील सर्व दुकानदाराने दुकाने बंद केली. मृतदेह तातडीने पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठवण्यात आले, तर स्थानिक पोलिसांनी जोरदार तपास सुरू केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close