सामाजिक

सायफरळ वासी नेटवर्कच्या बाहेर.

Spread the love

गावात टॉवर नसल्याने सायफळ ग्रामस्थांना द्यावे लागते नेटवर्क समस्यांला तोंड.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

घाटंजी तालुक्यातील अतीदुर्गम भागात येणाऱ्या व विदर्भ आणि मराठवाडा च्या सीमेवर असलेल्या सायफळ येथे कोणत्याही कंपनीचे नेटवर्क टॉवर नसल्यामुळे गावतील नागरीकांचे‌ मोबाईल शोभेचे वस्तू बनले आहे. आजकाल सर्व कामे ऑनलाईन झाल्याने नेटवर्क टॉवर विना जगणे कठीण झाले. कोरोणा पासून तर अनेक शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण सुध्दा ऑनलाईन असतात पण, सआयफळ मात्र ऑनलाईन व नेटवर्क ला अपवाद असलेले गाव ठरत आहे.गावात नेटवर्क टॉवर नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना गावाबाहेर जाऊन उंच ठिकाणी बसून अभ्यास करावा लागत असल्याचे चित्र नात्याने पाहायला मिळते.गावातील जनतेला सर्व कागदपत्रे गावातच मिळावे यासाठी शासनाने ग्रामपंचायत मध्ये सेतू केंद्र उपल्बध करून दिले आहे मात्र सायफळ येथे नेटवर्कच नसल्याने येथील सेतू केंद्रातून कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून सेतु केंद्रही शोभेची वस्तु ठरत आहे. अनेक ग्रामीण भागातील नागरीक डीजिटल व्यवहार करतात मात्र नेटवर्कच नसल्याने डीजीटल व्यवहार कसा करावा हे सुध्दा कठीण झाले आहे.साध मोबाईल वर कॉल बोलायचे म्हटले तरी येथील ग्रामस्थांना गावाबाहेर जाऊन कॉल करावे लागते. गावातील ग्रामसभेत नेटवर्क टॉवर बदल वारंवार प्रश्न उपस्थित करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणने असून याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून गावात कोणत्याहि कंपनीचे नेटवर्क टॉवर बसवुन ‘लोक विदेशात बोलतात निदान आमचा कॉलामच्या देशात व भागात लागेल अशी व्यवस्था करावी’ ही मागणी सायफळ ग्रामस्थांनाकडून केली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close