शैक्षणिक

नवजीवन शाळेत दहीहंडी व गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

Spread the love

 

राजेश सोनुने प्रतिनिधी पुसद तालुका

पुसद :- नवजीवन ज्ञानपीठ इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये दिनांक 09 सप्टेंबर 2023 शनिवार रोजी गोकुळाष्टमी निमीत्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण फॅन्सी ड्रेस व सामुहिक नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती ज्योती अग्रवाल,

उपमुख्याध्यापक श्री. लक्ष्मीनारायण यांच्या उपस्थीतीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे गोकुळाष्टमी निमित्त फॅन्सी ड्रेस व सामुहिक नृत्यामध्ये शाळेतील सर्व धर्मीय विद्यार्थी सहभागी झाल्यामुळे सर्वधर्मसमभाव या मूल्याची प्रचिती आली. व आजही भारत देशाची विधितेतील अखंडता व एकतेचे दर्शन या निमित्ताने झाले. या कार्यकमात सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सौ. गायत्री देशमुख, आसमा गाझीयानी, सौ. शारदा धुळधुळे, सौ. मयुरा उखळकर, सौ. स्मीता खडसे, सौ. वंदना पवार, सौ. प्रिती ढोणे, श्री. बालाजी बिरादर व स्का. गा. शिक्षक श्री. गजानन गवळी त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यकमाची सांगता दहीहंडी फोडुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विष्णु उगले यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close