हटके

शंकराच्या असीम भक्ता कडून  शिव मंदिरातच स्वतःची मान देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न 

Spread the love

गंभीर जखमी युवक रुग्णालयात आहेत उपचार सुरू 

ललीतपुर (युपी )/ नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                 स्वतःला अहिव भक्त म्हणवून घेणाऱ्या एका तरुणाने शंकराला स्वतःची मान अर्पण करुन जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तो गंभीर रित्या जखमी झाला आहे. झाड कापण्याच्या आरीने त्याने स्वतःची मान कापण्याचा प्रयत्न केला आहे.सुदैवाने त्याचा जीव वाचला असला तरी त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.

दीपक कुशवाह असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तो मजूर म्हणून काम करतो. 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दीपक त्यांच्या परिसरातील शिवमंदिरात गेला. मंदिरातच ‘जय भोलेनाथ’चा जप करत असताना झाड कापण्याच्या कटरने त्याने स्वत:ची मान कापण्याचा प्रयत्न केला.

मानेवर मशीन आदळताच दीपकचा किंचाळला, जो ऐकून गावातील लोक मंदिराच्या दिशेने पोहोचले. तेथे तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात सापडला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. दीपकला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.

दीपकचे वडील पल्टुराम कुशवाह यांनी स्वत: सांगितले की त्यांचा मुलगा भगवान शिवाचा ‘कट्टर’ भक्त आहे. तो देवाची खूप पूजा करत असे. पल्टुरामने सांगितले की, गेल्या काही महिन्यांत दीपकने अनेक वेळा मस्तकाचा बळी देऊन भगवान शिवाला प्रसन्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. इतकंच नाही तर त्याबद्दल त्यांनी एका चिठ्ठीत लिहिलं आहे.

दीपकच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी नेहमी त्यांना समजावून सांगितले की, स्वत:चा बळी देणे हा वेडेपणा आहे, परंतु मुलाने स्वत:चा बळी देण्याचा आग्रह धरला. मंगळवारीही त्याने हा हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सध्या जखमी दीपकवर झाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे आरोग्य अधिकारी सचिन माहूर यांनी सांगितले की, तरुणाचा गळा धारदार हत्याराने मोठ्या प्रमाणात कापण्यात आला आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे, त्यामुळे आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close