क्राइम

दोन ते तीन वर्षांपासुन फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

 

३ लाखाचा मद्देमाल केला जप्त.

वरूड/तुषार अकर्ते

मागील काही वर्षापासुन मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्रातील जिल्ह्यात चोरी तसेच घरफोडी करणारे व वरूड पोलिस स्टेशन हद्दीतील २२ गुन्ह्यातील दोन ते तीन वर्षापासुन फरार असलेले दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या मध्ये संगमसिंग जगदिशसिंग बावरी (३८) व चरणसिंग गब्बुसिंग भादा (३३) दोन्ही रा. शास्त्री नगर, पांढुर्णा (मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.
गुरूवार दि.३ ऑगस्ट रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरुड पोलीसांनी पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानुसार छत्तीसगढ येथील बालोद मध्यवर्ती कारागृहातुन या दोन्ही आरोपीना ताब्यात घेवून वरूड पोलीस स्टेशनला आणले व त्यांना घडलेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी विचारपुस केली असता पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण २२ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यांच्या ताब्यातुन १० गुन्ह्यातील मुददेमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. या मध्ये २ लक्ष ३५ हजार ६०० रूपयांचे ५८ ग्रॅम ९०० मिली सोण्याचे दागीने, नगद ४९ हजार ५०० रुपयांची रोखरक्कम व १० हजार रूपायांची एक क्विंटल तुर असा एकुण २ लक्ष ९५ हजार १०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिसअधिक्षक अविनाश बारगळ, ग्रामीन अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे, वरूडचे ठानेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात लक्ष्मण चिंचोले, पोलीस उपनिरीक्षक धिरज राजुरकर, मंगेश शेगोकार, राजु मडावी, दिपक जाधव, देविदास उईके, सुनिल आकोलकर, राजकुमार डिहीये, नंदकिशोर गवते, विनोद पवार, राजु चव्हाण, सचिन भगत, रत्नदिप वानखडे, योगेश ढंगारे, आकाश शेंडे, प्रफुल लेव्हरकर, जॉन रूबन, कीरण गावंडे, चैतन्य कुंटलवार,आकश आमले,अमीत जिचकार, पुनम डाहाके, रूपाली राउत, स्वप्ना बारसे, दिगांबर बावणे, यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close