उत्कर्ष दोषसिध्दीत पारवा पोलीस स्टेशन जिल्हात प्रथम
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
नुक्तेच जून २०२३ यवतमाळ जिल्हा पोलिस प्रशासनची आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत जिल्ह्यातील ३१ पोलिस स्टेशन मधील दोषसिध्दी करिता पारवा पोलीस स्टेशने जिल्हात प्रथम क्रमांक पटकाविला. घाटंजी तालुक्यातील पारवा स्टेशन हे दूर्गम भागातील असून त्यातही कमी मनुष्यबळ असूनही स्टेशन डायरीत दाखल गुन्हे संदर्भात आरोपीस शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा करून तक्रार दारास न्याय मिळवून देण्यात येत असल्याने पारवा पोलीस स्टेशनप्रती जनतेचा विश्वास वृध्दींगत ह़ोत आहे यासाठी पारवा पोलीस स्टेशन अधिकारी, अंमलदार पांढरकवडा विभाग उपविभागीय अधिकारी रामेश्वर व्यंजने यांचे मार्गदर्शन खाली विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड,अ.पो.अ. पियुष जगताप, पारवा ठाणेदार प्रविण लिंगाडे,विनोद चव्हाण,कोर्ट पैरवी अंमलदार गजानन शेकूजकर यांना फिरते देउन संन्मानित करण्यात आले.