सामाजिक

चुलत बहीण भावात जडलं प्रेम आणि असा झाला शेवट 

Spread the love

 नांदेड / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                 पाश्चात्य संस्कृती तरुणांच्या मनात घर करत असल्याने ते आपले संस्कार विसरले आहेत. नैतिकता या पातळीवर येऊन ठेपली आहे कीं आता लोकांना नाते संबंधाचे देखील भान राहत नाही. अशीच घटना जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे घडली आहे.

        सुप्रिया मारोती जाधव आणि रोहिदास हे नात्यात  बहीण  भाऊ असून समवयस्क असल्याने दोघेही प्रेमाच्या प्रवाहात वाहून गेलें.त्यांनी  लग्न करण्याचे देखील तजरवले होते.  ही बाब सुप्रियाच्या घरच्या लोकांना कळल्यावर त्यांनी या गोष्टीला विरोध दर्शविला.  लग्नास नकार मिळत असल्याने प्रेमीयुगुल नाराज होते. याच दरम्यान, ३ जुलैच्या मध्यरात्री रात्री रोहिदास हा सुप्रियाच्या घरी गेला. ४ जुलै च्या पहाटे मयत तरुणीची आजी लक्ष्मीबाईला जाग आली. ४ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास लक्ष्मीबाई यांना जाग आली. सुप्रिया त्यांना तिच्या खोलीत दिसली नाही. थोड्या वेळाने सुप्रिया बाथरूमधून बाहेर आली आणि तिच्या मागोमाग रोहिदास जाधव हा देखील बाहेर आला.

त्यानंतर रोहिदास हा वाड्याचे दार काढुन तेथून निघुन गेला. काही वेळातच सुप्रियाला उलट्या होऊ लागल्या. लक्ष्मीबाई यांनी तिची विचारपूस केली असता तिला रोहिदासने स्प्राईटच्या बाटलीमध्ये आणलेले कोणतेतरी विषारी औषध पाजले आहे, असे तिने सांगितले. दरम्यान, थोड्याच वेळानंतर रोहिदासने सुप्रियाला फोन केला आणि आपणही विष पिल्याचे सांगितले.

या प्रकारानंतर सुप्रियाला शेजाऱ्यांनी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. रोहिदासला देखील त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सुप्रियाचा मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मीबाई जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरुन उस्माननगर पोलीस ठाण्यात रोहिदास जाधव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत तरुणी ही आपल्या आई आणि भावासोबत लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथील रहिवासी होती. सद्या ती बीए प्रथम वर्षला शिक्षण घेत होती. याच गावात रोहिदास पद्माकर जाधव हा तरुण राहत होता. नाते संबंध असल्याने रोहिदास हा नेहमी घरी यायचा. याच दरम्यान त्याची ओळख सुप्रियासोबत झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ही बाब उघडकीस आल्यानंतर रोहिदास याच्या आई वडिलांनी लग्नाची मागणी घातली होती. मात्र, मुलीच्या आईने रोहिदासला आपली मुलगी देण्यास नकार दिला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close