हटके

सिंहिणीला देखील तिच्या नवऱ्याला महिलेचे हात लावणे आवडले नाही 

Spread the love

                        सगळ्यात हिंस्रक पशुत सिंहाची गणना होते. सिंह झु किंवा प्राणी संग्रहालयात असला तरी त्याच्या जवळ जाण्याची सहसा हिम्मत होत नाही. त्याच्या एका डरकाळी ने चड्डी ओली होते.  या प्राण्यांचा काही नेम नसतो त्यांना तुमची कुठली गोष्ठ आवडणार नाही हे सांगता येत नाही. शांत बसलेला हा प्राणी कधीही हिंस्रक होऊ शकतो. पण काही लोक अश्या पशु जवळ जाण्याची हिम्मत दाखवतात. सफारीवर गेलेल्या एका महिलेने सिंहा जवळ जाऊन त्याला कुरवाळण्याचा प्रयत्न करतात बाजूला बसलेल्या सिंहिणीला ते  आवडले नाही आणि ….

लोकांना जंगल सफारी करण्यात मजा येते. जंगली जनावर त्यातल्या त्यात सिंहाला क8नवा वाघाला पाहण्याची इच्छा असल्याने ते जंगल सफारी साठी जातात. आणि या वन्य प्राण्याला पाहण्याचा आनंद घेतात. बहुतेकदा सफारीमध्ये उपस्थित प्राणी विनाकारण कोणावरही हल्ला करत नाहीत. पण प्राण्यांच्या मूडचा काहीही भरवसा नसतो. त्यांचा मूड कधी बदलेल आणि ते कधी आक्रमक होतील, हे कोणीही सांगू शकत नाही.
त्यामुळे या प्राण्यांसमोर नेहमी सावध राहाणंच चांगलं. आता जंगली सफारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी सिंहाच्या जवळ जाताच सिंहिणीने तिला चांगलीच अद्दल घडवली. @findgoddd या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

यात तुम्ही पाहू शकता, की सिंह समोर दिसताच एक महिला त्याला स्पर्श करण्यास सुरुवात करते. हे पाहून शेजारी बसलेल्या सिंहिणीला इतका राग आला, की तिने लगेचच महिलेला तिथून पळवून लावलं. सिंहीणीने महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच सगळेच घाबरले. हा व्हिडिओ आतापर्य़ंत 2.29 लाखहून अधिकांनी पाहिला आहे.

 

 

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सफारीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलेला सिंह-सिंहिण जोडप्याला पाहून आनंद झाला.

भीती वाटत असतानाही ती हळूहळू सिंहाकडे जाऊ लागली. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती सिंहांसोबतचा तरुणीचा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ अधिक खास बनवण्यासाठी तो महिलेला सिंहाच्या जवळ येण्यास वारंवार सांगत ​​होता. शेवटी घाबरत ही तरुणी सिंहाला स्पर्श करायला गेली.

मात्र, महिलेने सिंहाला स्पर्श करताच सिंहीण संतापली. तरुणीनं सिंहाला हात लावताच सिंहीणीने तिचा अशा प्रकारे पाठलाग केला की बिचारी जीव वाचवण्यासाठी धावू लागली. सिंहाला हात लावण्याचा असा परिणाम होईल, याची कल्पनाही तिने केली नसेल. सिंहीण महिलेकडे धावतच व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, हे दृश्य आफ्रिकेच्या जंगलातील आहे. अनेकांनी कमेंटमध्ये विचारलं आहे, की या महिलेचं पुढे काय झालं?

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close