नाव आणि धर्म लपवून महिलेशी दोस्ती ; अनैतिक संबंध , चित्रीकरण आणि 3 लाख उकळले

अकोला / नवप्रहार न्यूज नेटवर्क
नाव आणि धर्म लपवून सोशल मीडियावर मैत्री करणे.त्यानंतर त्यांना प्रलोभन देऊन किंवा दबाब टाकून शारीरिक संबंध बनवणे. त्याचे चित्रीकरण करून वारंवार लैंगिक शोषण करणे आणि महिलेने लग्नाचा तगादा लावला तर तिच्यासमोर धर्मपरिवर्तनाची अट ठेवणे या प्रकारात भयंकर वाढ झाली आहे.असाच प्रकार अकोला जिल्ह्यातील अकोट येथे उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून अकोट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.”
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सैय्यद शरिफ सैय्यद शफी याने फेसबुक वर प्रेम पाटील या नावाने खाते उघडले होते. पीडित महिलेची त्याच्यासोबत फेसबुक वरून ओळख झाली. दरम्यान त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. वेळप्रसंगी बोलणं देखील होऊ लागलं. कालांतराने ही मैत्री प्रेमात परिवर्तित झाली. सैय्यद ने गोडीगुलाबीने बोलुन महिलेशी जवळीक साधत तिच्यावर दबाब टाकून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेचे चित्रीकरण करून तो तिला ब्लॅकमेल करीत वाफामवार तिचे शारीरिक शोषण करू लागला. इतकेच नाही तर त्याने तिच्याकडून वेळोवेळी 3 लाख रुपये देखील घेतले. पीडितेचे लैंगिक शोषण करतां यावे यासाठी त्याने तिच्या घराच्या मागे भाड्याने खोली देखील घेतली होती. पीडितेचा नवरा घराबाहेर पडला की तो तिच्या घरात घुसून शरीर संबंधाची मागणी करीत होता. तिने नकार दिल्यास चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत होता.
अखेर आरोपी सैय्यदच्या त्रासाला कंटाळून ३२ वर्षे महिलेने सर्व घटनाक्रम आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर पतीसह कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आता अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सैय्यद शरीफ सैय्यद शफी ला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.आरोपीची क्रूरता इतकी वाढली होती, की पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवता यावे या उद्देशाने त्याने तिच्याच घरामागे एका रुम किरायाने घेतली होती. पीडित महिलेचा पती घराबाहेर गेला, की आरोपी तिच्या घरी जायचा आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा.
– लव्हजीहाद साठी कडक कायदा बनवणे आवश्यक – नाव बदलून आणि धर्म लपवून किंवा बनावट अकाउंट द्वारे अल्पवयीन मुली किंवा महिलांना फासण्याच्या घटनेत भयंकर वाढ झाली आहे, अश्या प्रकरणात मुली किंवा महिलांचे मनात येईल तो पर्यंत लैंगिक शोषण केल्या जाते. मुली किंवा महिलांनी लग्नासाठी दबाब टाकल्यास त्यांच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाब टाकला जातो. त्यामुळे लव्ह जिहाद साठी नाविन आणि कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
– पीडितेच्या लक्षात हा प्रकार का येत नाही – अनेक प्रकरणात असे पाहायला मिळत आहे की महिलांचे किंवा तरुणीचे काही काळ लैंगीक शोषण झाल्यावरच या गोष्टी उघड होतात. महत्वाचे असे की मोबाईल वर जेव्हा तरुणी किंवा महिलांचे अश्य लोकांशी बोलणे सुरू असतांना त्यांच्या लक्षात हा प्रकार का येत नाही असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. बुद्धिजीवी वर्गानुसार एका विशिष्ट समुदायाच्या लोकांशी बोलतानाच त्यांच्या संवाद शैलीतून त्यांच्या धर्माबद्दल कल्पना येते. त्यामुळे अश्या प्रकरणाला बळी पडलेल्या तरुणी किंवा महिलांच्या लक्षात हा प्रकार का येत नाही हा देखील कळीचा मुद्दा ठरत आहे.