सामाजिक

धनगर कर्मचारी संघटना धामणगाव रेल्वे चे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती संपन्न

Spread the love

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

दि.३१ मे २०२३ ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्सव *मा. श्री. प्राचार्य भाऊराव गाढवे यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शक मा. श्री राजाभाऊ डांगे ( आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक) , प्रमुख अतिथी मा. श्री. काशिनाथजी फुटाणे, प्रकाशराव वाडे, श्री मातकर सर* यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी संघटनेचे जेष्ठ सदस्य *श्री. आगर सर, जुना धामणगाव येथील ग्रा. पं सदस्या सौ वर्षाताई महात्मे, सत्कार मुर्ती श्रीमती वाघमारे* उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंतर *कु. पुर्वा निखार, कु. दाते, साक्षी धवणे* या विद्यार्थ्यींनीनी आपल्या मनोगतातून अहिल्यादेवीच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला. कु. साक्षी धवणे हिने आपल्या प्रज्वळ व प्रखर वकृत्व शैलीने उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर प्रमुख मार्गदर्शक *मा. राजाभाऊ डांगे यांचे सामाजिक कार्य व केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक* म्हणून मान्यता प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या सभासद *श्रीमती कौशल्याताई वाघमारे या आपल्या दिर्घ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त* झाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष *श्री. भाऊराव गाढवे हे श्री संताजी कर्मचारी पतसंस्थेच्या कोषाध्यक्ष पदी तर श्री रामेश्वर गावंडे आणि सुनिल भावेकर हे अर्थकलश मागासवर्गीय पतसंस्थेच्या संचालक पदी* निवडून आल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक *श्री . डांगे साहेब यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक तथा राजकीय कार्य लोकाभिमुख असून आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले*. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी *मा. श्री काशिनाथजी फुटाणे, श्री प्रकाशराव वाडे यांनी अहिल्यादेवीचे जीवन कार्य व समाज संघटन याबाबत उपस्थितांसमोर माहिती सांगितली. तसेच गोपालराव थोटे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.*
*जगातील महाराण्यांपैकी अहिल्यादेवी ही एक जागतिक कीर्तीची महाराणी असून धनगर जमात ही राज्यकर्ती जमात असल्याचे ऐतिहासिक दाखले* अध्यक्षीय मनोगतातून श्री प्राचार्य भाऊराव गाढवे यांनी उपस्थितांसमोर मांडले.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. अविनाश थोटे यांनी तर आभारप्रदर्शन संघटनेचे जेष्ठ सदस्य श्री गोविंदराव आगरकर सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. शुभांगी गावंडे व सौ. रूपाली होटे यांनी सांभाळले.*
सदर कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी *श्री. गोवर्धन मुंदाने, मधुकर निखार, ओंकाराव उंदरे, प्रा. पंकज धामसे, डॉ. प्रकाशराव बुंधाडे, सौ. रुपाली सावलकर , सौ मीनाताई थोटे, ॠतुजा निखार, ज्योत्स्ना निखार* व जुना धामणगाव येथील तसेच धामणगाव नगरीतील समाज बंधू – भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close