Uncategorized

बापा वर 17 वर्षीय मुलीचा मृतदेह बाईक वरुन नेण्याचा ओढावला दुर्दैवी प्रसंग

Spread the love

या कारणामुळे जिल्ह्याधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांची माजली धावपळ

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                     राज्य कुठलंही असो त्यात अश्या काही घटडतात की राज्यात शासन आणि प्रशासन लोकाभिमुख आहे की नाही असा प्रश्न सहज पडतो. कारण शासन जनतेसाठी अनेक योजना काढल्याचे सांगत असतो. पण त्या कार्यन्वित करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. त्यानंतरही या योजना कार्यान्वित झाल्या नसतील आणि त्या संदर्भात तक्रारी झाल्या असतील तर संबंधीतांवर कारवाई करण्याची जबाबदारी ही शासनाची असते. क्वचित घटना सोडल्या तर असे होत नाही. आणि यामुळेच सामान्य माणूस या चक्रात भरडल्या जातो. अशीच एक दुर्दैवी घटना मध्यप्रदेश मधून समोर येत आहे. 

केशवाहीतील कोटा गावात राहणारे लक्ष्मण सिंह यांची मुलगी माधुरी सिकलसेल या आजाराने ग्रासलेली होती. माधुरीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या पालकांना तिचा मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली होती. परंतु, रुग्णवाहिका ही १५ किलोमीटर अंतरापर्यंत मिळू शकते, असे त्यांना सांगितले. या पीडित लक्ष्मण यांचे गाव रुग्णालयापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना खासगी वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. परंतु, लक्ष्मण यांच्याकडे खासगी वाहनाला देण्याऐवढे पैसे नव्हते. यानतंर लक्ष्मण आणि त्यांच्या कुटुंबियांनी दुचारीवरून मुलींचा मृतदेह नेहण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मुलीचा मृतदेह दुचाकीवर ठेवल्यानंतर गावाच्या दिशने निघाले असताना. जिल्हाधिकारी  परंतु, हा संपूर्ण प्रकाराची माहिती जिल्हाधिकारी वंदना वैद्य  आणि सिव्हिल सर्जन डॉ. जी. एस. परिहार  यांना मिळाली. यानंतर जिल्हाधिकारी वैद्य आणि डॉ. परिहार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित पालाकांना मुलीचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनाची सोय केली. आणि आर्थिक मदत केली. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close