राज्य/देश

अतिक अहमद चे दहशतवादी कनेक्शन ? मुस्लिम मुलांना परदेशात पाठवत होता ट्रेनिंगला

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

           अतीक आणि  अशरफ अहमद यांच्या बाबत एटीएस कडून धक्कादायक माहिती देण्यात येत आहे. अतिक आणि अशरफ मुस्लिम तरुणांना परदेशात पाठवून त्यांना दहशतवादी संघटनेशी जोडायचे  असे बोलल्या जात आहे. त्या बदल्यात त्यांना शस्त्रांची खेप मिळत होती आणि ते शस्त्र पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोन द्वारे पाडली जायचे असे समोर येत आहे.

. अतिक आणि अशरफने किती तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी पाठवले होते, याचा एटीएस तपास करत आहे. सप्टेंबर 2021 रोजी यूपी एटीएसने झीशान कमरला पकडले, त्यानंतर त्याची अतिक अहमद आणि अशरफ यांच्यातील जवळीक उघड झाली. झीशान कमरला सप्टेंबर २०२१ मध्ये प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. त्याला भारतात दहशतवादी कारवाया करायच्या होत्या.

2017 मध्ये, अशरफने पासपोर्ट अधिकाऱ्याला एक शिफारस पत्र लिहून झीशानचा पासपोर्ट त्वरित देण्यास सांगितले. झीशानच्या अटकेनंतर यूपी एटीएस त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. एटीएस अशा लोकांची कागदपत्रे तपासत आहे, ज्यांना पासपोर्ट बनवण्यासाठी अशरफ आणि अतिक यांनी शिफारस केली होती, अशी किती शिफारस पत्रे पाठवली होती याचाही तपास केला जात आहे.आतिक आणि अश्रफ यांना प्रयागराजमध्ये मुस्लीम वस्ती स्थापन करायची होती, ज्यामध्ये करेली, खुलदाबाद, शहागंज, अतरसुईया, चकिया, अटाला आणि प्रयागराजचा कासारी मसारी किल्ला समाविष्ट होता, असे तपासात समोर आले आहे. हे लोक मुस्लिम तरुणांना पैसे आणि इतर प्रलोभने देऊन आखाती देशांमध्ये पाठवायला तयार करायचे, त्यानंतर त्यांना पाकिस्तानात पाठवले जात होते. आयएसआयच्या सूचनेनुसार अशरफ तरुणांना भारतातील काफिरांशी युद्ध करण्यासाठी मानसिकता तयार करत असे, असेही तपासात उघड झाले आहे. कोणाला काही अडचण येऊ नये म्हणून अतिक आणि अशरफ स्वतः प्रत्येक तरुणाला फोन किंवा लेटर पॅडवर लिहून शिफारस करायचे. यूपी एटीएस अशा तरुणांची यादी तयार करत आहे. अशरफ आणि अतिक या तरुणांनी परदेशात पाठवलेली कागदपत्रे जमा केली आहेत, ती कागदपत्रे विभागांकडून मागवली जात आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close