जुनी पेशन सुरु करण्या साठी चिमूर तहसील समोर अंदोलन
चिमूर प्र, ता,डॉ,ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर —-सम्पूर्ण राज्यात नोव्हेंबर 2005नंतर लागलेल्या कर्मचारी यांची जुनी पेंशन लागू करण्यात यावी या मागणी करीता राज्य भर कर्मचारी बेमुदत अंदोलन करीत आहेत अटल बिहारी वाजपीये यांनी पेन्शन बंद केली त्यानंतर 2006मध्ये लागणाऱ्या कोणत्याही कर्मचारी बांधवाना पेन्शन मिळणार नाही हे जी आर मध्ये नमूद करण्यात आले परंतु पेन्शन ही कर्मचारी बांधवाना ची मातार पणातील संजीवनी आहे असे असतांना पेशन बंद करणे योग्य नाही, कर्मचारी संघटना यांनी सरकार कडे जुनी पेंशन लागू करावी या करीता अनेक दा निवेदन दिले मोर्चे काढले परंतु यावर तोडगा आज पर्यत निघाला नाही यावेळेस सर्वच कर्मचारी संघटनी जुनी पेन्शन लागू करावी या करीता बेमुदत उपोषण पुकारला आहे सध्या दहावी, बारावी यांचे बोर्डाचे पेपर सुरु आहेत जर शिक्षक सम्पात सहभागी झाले आहेत बोर्डाच्या परीक्षा कसे होणार परीक्षा झाल्या तरी पेपर तपासणार कोण 10,वि 12वि च निकाल वेळेवर लागणार काय असे अनेक प्रश्न पालकांना पडले आहे कोरोना काळा नंतर आता कुठे तरी शिक्षण सुरळीत सुरु झाले आहे डॉकटर सुद्धा या मध्ये सहभागी झाले आहे रुग्णालयात रुग्णाची तपासणी करणार कोण राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की जुनी पेन्शन जर लागू केली तर एक लाख कोटींचा बोझा राज्य सरकार वर पडेल या अंदोलना मुळे जुनी पेशन कर्मचारी यांना लागू होणार काय असे प्रश्न निर्माण झाले आहे