क्राइम

नागपूर हादरलं.. घरात घुसून गोळीबार करत एकाची हत्या 

Spread the love

नागपूर  / नवप्रहार मीडिया

उपराजधानीत मागील काही काळापासून और असलेले हत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. विनय पुणेकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजनगर परिसरात ही घटना घडली आहे. घरात घुसून आरोपींनी विनय पुणेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.

विनय पुणेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पत्नीपासून विभक्त एकटेच राहत होते, त्यांच्या हत्येमागे नेमकं कोण आहे? याचा तपास सुरू आहे. हत्येच्या तपासासाठी नागपूर पोलिसांनी एक टीमही तयार केली आहे. ही टीम तपासासाठी रवाना झाली आहे.

विनय पुणेकर यांच्या हत्येप्रकरणी एका तरुणाचा व्हिडिओ आणि फोटो समोर आला आहे. यामागे नेमकं कोण आहे? हे अद्याप कळू शकलेलं नाही. तरुणाची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close