अपघात

18 महिन्याच्या चिमुकलीचा ऑटो च्या धडकेत मृत्यू

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी

            घराबाहेर खेळत असलेल्या एका 18 महिन्याच्या चिमुकलीचा ऑटो ने धडक दिल्याने त्यात चिमुकलीचा करून अंत झाला आहे. घटना वाठोडा पोलिस स्टेशन या हद्दीत खरबी परिसरात घडली आहे.

प्रियांशी विष्णू देवपाच असे मृत बालिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी ले-आऊट, साई बाबानगर, खरबी येथील प्लॉट नंबर 83 च्या शेजारी असलेल्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तिथे सेंट्रींगचे सामान टाकण्यासाठी शुक्रवारी (ता.30) दुपारी 1 वाजताच्या सुमारास एमएच 49 बीझेड 6529 टेम्पो आला. त्याने सेंट्रींगचे सामान काढून ठेवले. त्यानंतर गल्ली छोटी असल्याने चालक विष्णू सावनलाल गौतम (51, धनगवळी बाबानगर) याने टेम्पो रिव्हर्स घेतला.

मात्र, मागे प्रियांशी खेळत होती. त्यामुळे तिला वाहनाची धडक लागली. त्यात ती गंभीर जखमी झाली. विष्णू आणि काही नागरिकांनी तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुलीचे वडील विष्णू गुरुप्रसाद देवपाच (30) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अतुल पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नुकतीच लागली होती चालायला

प्रियांशी 18 महिन्यांची झाली होती. महिन्यांपूर्वीच ती चालायला लागली होती. त्यामुळे घरासह परिसरात ती दुडूदुडू धावत असे. घटनेपूर्वी ती घरातून बाहेर निघून खेळत होती. खेळता खेळता ती वाहनामागे गेली. त्यातून हा अपघात झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close