Uncategorized

जंगलाचा राजा शांत आहे तो पर्यंतच …..

Spread the love

                   सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही जंगली प्राण्यांचे देखील असतात. सोशल मीडियावर जंगली प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात जंगलाचा राजा असलेल्या आणि सगळ्यात हिंस्त्र पशु म्हणून ओळख असलेल्या सिंहाला तरस प्राण्याच्या समूहाकडून डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण शेवटी तो जंगलाचा राजा आहे. कुठपर्यंत शांत बसणार.

तरस जंगलातील असा प्राणी आहे, जो बऱ्याचदा समूहामध्ये राहतो आणि शिकारही समूहानेच करतो. सिंह, बिबट्या, वाघ यांसारखे हिंस्र प्राणीदेखील तरस प्राण्याला खूप घाबरतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. तरस प्राण्यांचा समूह विनाकारण सिंहाला त्रास देत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये सिंह झुडपामध्ये शांत उभा असून यावेळी तरसांचा समूह तिथे येतो आणि सिंहाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्यातील दोन-तीन तरस सिंहाच्या मागे उभे राहतात आणि त्याच्या शेपटीला त्रास देतात. यावेळी सिंह तरसांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे तरस पुन्हा सिंहाच्या मागे उभे राहतात आणि त्याची शेपूट तोंडात घेऊन जोरात ओढतात. यावर सिंह त्यांच्या अंगावर धावून येण्याचं नाटक करून त्यांना दूर करतो.पण, सिंहाची ही मस्करी या प्राण्यांना महागात पडू शकते. सिंह आपला संयम सोडून कधी त्यांच्यावर हल्ला करेल हे सांगू शकत नाही. तरस आणि सिंहाच्या या गमतीशीर व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

 

 

 

 

हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @Latestsightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाल्या आहेत, तसेच सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “मला हे पाहून खूप हसू आलं”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हा प्राणी इतर प्राण्यांसाठी खूप त्रासदायक आहे”, तर तिसऱ्याने लिहिलेय, “सिंहाची मस्करी करणं सोपी गोष्ट नाही.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close