क्राइम

लॉज वर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा

Spread the love

या कारवाईमुुळे लॉज मालकांचे धाबे दणाणले

संभाजी नगर / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                    लॉज मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून  लॉज मालकसह तीन दलालांना अटक केली आहे.मुख्य म्हणजे सदरची लॉज भर वस्तीत असून लॉज च्या आजूबाजूला निवासस्थाने आहेत. या कारवाईमुळे परिसरातील लॉज मालकांचे धाबे दणाणले आहे.

वाळुंज शहरातील ओमसाई लाॅजिंग अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. नागरी वसाहतीतील या लाॅजिंगवर ४ ते ५ महिलांकडुन वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती डायल ११२ या पोलिसांच्या नंबरवर  मिळाली होती. या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी ठाण्याचे दुय्यम निरीक्षक गणेश ताठे यांच्यासह एक पथक तयार केले.


त्यानंतर लाॅजिंगवर बनावट ग्राहकाला पाठवले. त्यानंतर लाॅजिंगवरील दलाल योगेश भोजू जाधव याने एक हजार रूपये घेत बनावट ग्राहकाला लाॅजिंगच्या रूममध्ये सोडले. दरम्यान पंटरने इशारा केला आणि पोलीसांनी  छापा  टाकला 
यावेळी लाॅजिंगच्या विविध चार रूममध्ये चार वेश्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.बनावट ग्राहकाला पाठवून टाकला छापा

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close