क्राइम

 सहा दिवसांपासून बेपत्ता डॉक्टर ची हत्या झाल्याचे उघड 

Spread the love
 मृतदेह पोत्यात भरून तलावात फेकला
आरोपी आणि साथीदारास अटक 
जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचे समोर 
प्रतिनिधी/ जळगाव
 जळगावच्या पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथून बेपत्ता झालेल्या डॉक्टर संजय तेली यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आज सकाळी बहुळा धरणातून गोणीत बांधलेला त्यांचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
१८ नोव्हेंबर रोजी एक कोटी २५ लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारासाठी डॉक्टर तेली गोरडखेडा येथे आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईलचे शेवटचे लोकेशन गोरडखेडा येथे मिळाले होते. तसेच त्यांची कारही परिसरात आढळली होती.
जमिनीच्या वादातून हत्या, मृतदेह लपविण्यासाठी संजयची मदत
पोलिसांनी संशयावरून राहुल धर्मराज पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सालदार संजय भील याने मदत केल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीला जमिनीच्या व्यवहारापोटी ८० लाख रुपये दिले होते, अशी माहिती डॉक्टर तेली यांच्या कुटुंबीयांनी दिली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.
सहा दिवसांपासून बेपत्ता डॉक्टरांच्या हत्येचा छडा लागला
संशयितांनी मृतदेह धरणात फेकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी काल दुपारपासून शोधमोहीम सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र, अंधारामुळे अडथळे येत असल्याने शोधमोहीम थांबवून आज सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. अखेर या शोधमोहिमेत डॉ. संजय तेली यांचा मृतदेह आढळून आला. सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉक्टरांच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी लावला छडा लावला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close