त्याने त्याला समजवले नाही मानला तर संपवले

मिस्त्री काम।करणाऱ्या पुरुषाचे त्याच्याच कामावर असलेल्या महिलेशी अनैतिक संबंध होते.तो तिच्या घरी देखील यायचा ही बाब तिच्या 16 वर्षीय मुलाला खटकत होती. तो चार वर्षांपासून सुरू असलेल्या या अनैतिक संबंधाला कंटाळला होता. वयात येत असल्याने त्याला या गोष्टी समजत होत्या. आणि समाजात होणारी बदनामी बोचत होती. त्याने त्याला समजावले देखील पण तो मनात नव्हता. शेवटी त्याने त्याच्या डोक्यात काठी टाकून त्याला संपवले.
गोंदिया / नवप्रहार मीडिया नेटवर्क
सुनील देवदास बांते (40) रा. चांदोरी खुर्द असे मृताचे नाव आहे. त्याचा खून करणारा विधीसंर्षीत बालक हा 16 वर्षाचा आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदोरी खुर्द येथील सुनील बांते (40) हा आपल्या सोबत गवंडी कामावर बघोली येथील एका विधवा महिलेला नेत होता. ती विधवा असल्याने कामावरच या दोघांचे सूत जुळले. मृतक त्या महिलेलच्या घरी जात असल्याने ही बाब तिच्या मुलाला खटकत होती. यातूनच त्याने सुनील बांतेच्या डोक्यावर काठीने वार करून त्याचा खून केला. सुनील बांते हा नेहमी प्रमाणे १ जुलै रोजी कामावरून आल्यावर आपल्या घरी गेला. हातपाय धुतल्यावर तयार होऊन नेहमीप्रमाणे बघोली येथे गेला. बघोली येथे खूप दारू पिऊन तो चौकात बसून होता.
इकडे-तिकडे फिरल्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास तो घरी जायला निघाला. परंतु तो चांदोरी खुर्द गावाच्या 200 मीटर अंतरावरच त्याच्या डोक्यावर काठीने वार करून 16 वर्षाच्या बालकाने त्याचा खून केला. त्याच्या मृतदेहाच्या 1 मीटर अंतरावर त्याची सायकल पडलेली होती. डोक्यावर जखमा होत्या. दवनीवाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलिस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, सुकदेव राऊत, पोलीस शिपाई टेभेंकर, धनेश्वर पिपरेवार, हर्षे व गोंदियावरून श्वान पथक बोलविण्यात आले. त्या बालकाला ताब्यात घेतल्यावर त्याने या कृत्याची कबुली दिली. त्याच्याविरूध्द दवनीवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार वर्षापासून होते अनैतिक संबध
मृतक सुनील बांते याचे विधीसंघर्षीत बालकाच्या आईसोबत मागील चार वर्षापासून अनैतिक संबध होते. मुलगा वयात येत असताना त्याला या सर्व गोष्टी समजू लागल्याने त्याने विरोध करण्याच्या आधीच खून करून त्याची कटकट संपविली. आपल्यासोबत तिला गवंडी कामावर घेऊन जात असतांना त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले.
महिनाभरापूर्वी दिली होती तंबी
मृतक हा विधवा महिलेकडे नेहमीच जात असल्याने तू येऊ नको अशी तंबी त्या विधी संघर्षीत बालकाने मृतकाला महिनाभरापूर्वी दिली होती. परंतु मृतकाने त्याच्या धमकीला न जुमानता आपला प्रयोग सुरूच ठेवला होता. यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.
तासभरात आरोपीला अटक
दवनीवाडा पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यानंतर गावातून माहिती घेतल्यानंतर त्यांना धक्कादायक माहिती हाती लागली. माहितीच्या आधारावर याप्रकरणाचा छडा लावीत पोलिसांनी आरोपीला तासाभरातच अटक केली.