निळा ड्रम कांड मुस्कान आणि साहिल दोषी, कोर्टाचा निर्णय

कोर्ट काय शिक्षा सुनावते याकडे जनतेचे लक्ष
नवी दिल्ली /विशेष प्रतिनिधी
पतीला प्रियकराच्या मदतीने ठार करून त्याची बॉडी निळ्या ड्रम मध्ये भरणाऱ्या मुस्कान आणि तिचा कथित प्रियकर याला सौरभ हत्याकांडात कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
तब्बल 126 सुनावण्या आणि 22 हून अधिक साक्षीदारांच्या जबानीनंतर हा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. न्यायालय 14 ऑक्टोबर रोजी या दोन्ही दोषींच्या शिक्षेची घोषणा करणार आहे.
सरकारी पक्षाच्या वतीने दोन्ही दोषींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. डीजीसी के. के. चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व साक्षी, पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना कठोर कठोर शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला आहे.
निळ्या ड्रममध्ये लपवला होता मृतदेह
3 मार्च 2025 रोजी सौरभची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सिमेंटने भरलेल्या एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये लपवून ठेवण्यात आले होते. हत्या केल्यानंतर 4 मार्चच्या संध्याकाळी मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशला पळून गेले होते. 17 मार्च रोजी दोघेही परतले आणि 18 मार्च रोजी या धक्कादायक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुस्कान व साहिलला अटक केली आणि 19 मार्च रोजी न्यायालयात हजर केले. तेव्हापासून दोघेही तुरुंगात न्यायमूर्तींच्या कोठडीत आहेत.
सौरभचा भाऊ बबलू राजपूत याची न्यायालयात तब्बल आठ वेळा साक्ष
जुलै 2025 मध्ये हा खटला जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आला. त्यानंतर या प्रकरणाची सातत्याने सुनावणी घेण्यात आली. मृत सौरभचा भाऊ बबलू राजपूत याची न्यायालयात तब्बल आठ वेळा साक्ष नोंदवण्यात आली. त्याने आपल्या भावाच्या हत्येचा थेट आरोप मुस्कान आणि साहिलवर केला. सौरभची आई रेणू राजपूत यांनीदेखील न्यायालयात हजर राहून आरोपींच्या संबंधांबद्दल आणि घटनेशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर साक्ष दिली.14 ऑक्टोबरकडे संपूर्ण देशाचे लक्ष
दोषी सिद्ध झाल्यानंतर आता दोन्ही आरोपींच्या शिक्षेच्या प्रमाणावर निर्णय होणार आहे. सरकारी पक्षाने फाशीची मागणी केली आहे, तर बचाव पक्षानेही आपला अंतिम युक्तिवाद केला आहे. 14 ऑक्टोबर रोजी न्यायालय आपला अंतिम निकाल सुनावणार असून निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.




