क्राइम

शिकवणीचा बहाण्याने घरी बोलवून महिला शिक्षिकेने केले अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण 

Spread the love

वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये रूम बुक करून विद्यार्थ्याला न्यायची 

गुरुग्राम ( हरियाणा) / नवप्रहार ब्युरो 

                  मागील काही काळात गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. अशा प्रकरणात पूर्वी पुरुष गुरू कडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्या गेल्याच्या घटनांचा समावेश होता. पण अलीकडे मात्र महिला शिक्षकांकडून किशोर वयीन मुलांना आपल्या प्रेमात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकार समोर येत आहे. एका 35 वर्षाच्या महिला शिक्षिकेनं इयत्ता बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार हरियाणातील गुरुग्राम येथे घडला आहे.

ही घटना गुरूग्राममधील रेवाडी येथील आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एका नामांकीत शाळेतील विवाहीत महिला शिक्षिकेनं आणि हॉटेलमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांशी शरीरसंबंध ठेवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलं. संबंधित प्रकरणात विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित तपासादरम्यान, दावा करण्यात आला की, महिला शिक्षिकेनं शिकवणीच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थ्याला घरी बोलावत शरीर संबंध ठेवले. शिक्षिकेने विद्यार्थ्याला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे अमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला.

महिला शिक्षिका ही रुमचं बुकींग करताना विद्यार्थी हा आपला नातेवाईक असल्याचं सांगायची. या दरम्यान, ती रोख रक्कम देत असे जेणेकरुन कोणतेही डिजिटल पुरावे सापडणार नाहीत. दरम्यान, महिलेचे तिच्या पतीसोबत अनेकदा वाद विवाद झाले होते. त्यानंतर महिला दुसरीकडे राहण्यास गेली आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याला बोलवू लागली आणि त्याच्यासोबस शरीरसंबंध ठेवू लागली.

या प्रकरणाची माहिती पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना कळाली. त्यानंतर 13 मार्च रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे शिक्षिकेला माहिती असूनही तिने त्यासोबत शरीर शोषण केलं.

संबंधित तक्रारीला आता तीन महिने उलटून गेली आहेत. मात्र, आरोपी फरार असून न्यायालयाने महिला शिक्षिकेचा अटकपर्व जामीन फेटाळला आहे. या प्रकरणात दोघेही शरीरसंबंध ठेवतानाचे अश्लील व्हिडिओ महिला शिक्षिकेकडे आहेत. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close