क्राइम

पाण्याच्या टँकर मधून पाणी येणे झाले बंद : आत मध्ये डोकावताच दिसले असे दृश्य

Spread the love

फुरसुंगी  / नवप्रहार डेस्क 

                          फुरसुंगी येथील पावर हाऊस परिसरात आलेल्या टँकर मधून लोकं पाणी भरत असतांना पाणी येणे अचानक बंद झाले. टँकर चालकाने तपासले असता त्याला साडीचे कापड  दिसले. त्याने ते ओढले असता काही अंतरानंतर ते बाहेर आले नाही. त्यामुळे त्याने टँकर वर चडून आत डोकावले असता त्याला जे दिसले ते पाहून त्याने सरळ पोलिसांनाच फोन केला.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल्या मुकेश मोर्या (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) असं मृत महिलेचं नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात ही महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. येथील पावर हाउस या भागात नेहमीप्रमाणं सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाण्याचा टँकर आला होता. पाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

सुरुवातीला टँकरमधून पाणी सुरू झाले, मात्र काही वेळाने एकदमच पाणी येणे बंद झाले. पाणी बंद का झाले हे पाहण्यासाठी उतरलेल्या टँकर चालकाला साडीचा तुकडा अडकल्याचे निदर्शनास आले. साडीचा तुकडा ओढून देखील बाहेर निघत नसल्याने टँकरवर चढून त्यानं टँकरमध्ये डोकाऊन पाहिलं असता महिलेचा मृतदेह असल्याचे त्याला दिसले. त्याने याबाबत त्वरित हडपसर पोलिसांना संपर्क साधून याची माहिती कळवली.

हडपसर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी त्वरित धाव घेत हा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत पुढील तपासासाठी हा मृतदेह ससून रुग्णालयात शव विच्छादनासाठी पाठवला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close