विशेष

वाघाने केली गो-ह्याची शिकार

Spread the love

वडगांव पो.स्टे.वनपरिक्षेत्रा अंतर्गत येळाबारा वर्तुळातील घटना

घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी -दि.२६ ऑगस्ट रोजी रात्री वडगांव पो.स्टे. वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या येळाबारा येथील शेतकरी प्रविण बोद्रे यांच्या मालकीचा गो-हा रात्रीच्या वेळी शेतात बांधून असतांना वाघाने गो-ह्याचा फडशा पाडल्याची घटना सकाळी शेतात उघडकीस आली. या घटनेची माहिती शेजारच्या शेतकऱ्यांणी लक्षात आणून दिली तेव्हा शेतक-याणी वनविभागाच्या कर्मचारी यांना घटनेची माहिती दिली. येळाबारा गाव,परिसर हा वनविभागाच्या जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे या परिसरात वाघांचा मुक्त वावर वाढल्याने नागरिकांत दहशत व त्रास सहन करावा लागत आहे. येळाबारा शेत शिवारातील या घटनेने शेतकरी व शेतमजूर यांच्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणातून जनते व शेतकरी वर्गात वडगांव वनपरिक्षेत्रात कार्यरत असणारे वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल हे मुख्यालयी राहत नसून जिल्ह्याच्या ठिकाणाहून आपले कर्तव्य पार पाडत असल्या बाबतही ओरड सूरू असल्याने जंगलावर दुर्लक्ष होत असल्याचेही कळते.तरी वडगांव पो.स्टे.वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी या परिसरात लक्ष पुरवून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यालयाकडे लक्ष पुरवावे. तसेच येळाबारा गावालगत असणाऱ्या वनविभागाच्या जंगलातील मौल्यवान सागवान वृक्ष व ईतरही वृक्षामूळे अगोदर किर्र असणारी जंगल आता विरळ झाली आहे.या जंगलाच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांच्या हौदोसावर प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणी नुकसान भरपाई द्यावी अशी ही मागणी आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close