राज्य/देश

महिलेला ठार करणारी टी-१३ वाघीण अखेर जेरबंद

Spread the love

गडचिरोली, /तिलोत्तमा हाजरा

चार दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्यातील रामाळा येथे महिलेला ठार करणाऱ्या टी- १३ या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला आज सकाळी यश आले आहे..
१९ आॅक्टोबरला आरमोरी शहरातील काळा गोटा परिसरात राहणारी ताराबाई धोडरे ही वृद्ध महिला रामाळा येथील शेतात धान कापत असताना वाघिणीने तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतरही त्या परिसरात वाघिणीचा वावर होता. ती हल्ला करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर वनविभागाने वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शार्प शूटर अजय मराठे यांनी आज सकाळी पावणे आठ वाजता मुल्लूर चक येथील जंगलात वाघिणीला डार्ट करून कुठलीही इजा न करता तिला जेरबंद केले. वाघिणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिला नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले. गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक संदीप भारती, वनपरिक्षेत्राधिकारी पवनकुमार जोंग यांच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वी करण्यात आली. यात आरआरटी दिनेश टेंभुर्णे, योगेश लाकडे, गुरू नानक ढोरे, वसीम शेख, विकास साजरे, प्रफुल्ल वाटगुरे, निकेश शेंदरे, मनन शेख, करपे, दांडेकर यांनी भाग घेतला.
गडचिरोली, : चार दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्यातील रामाळा येथे महिलेला ठार करणाऱ्या टी- १३ या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला आज सकाळी यश आले आहे..
१९ आॅक्टोबरला आरमोरी शहरातील काळा गोटा परिसरात राहणारी ताराबाई धोडरे ही वृद्ध महिला रामाळा येथील शेतात धान कापत असताना वाघिणीने तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतरही त्या परिसरात वाघिणीचा वावर होता. ती हल्ला करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर वनविभागाने वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शार्प शूटर अजय मराठे यांनी आज सकाळी पावणे आठ वाजता मुल्लूर चक येथील जंगलात वाघिणीला डार्ट करून कुठलीही इजा न करता तिला जेरबंद केले. वाघिणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिला नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले. गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक संदीप भारती, वनपरिक्षेत्राधिकारी पवनकुमार जोंग यांच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वी करण्यात आली. यात आरआरटी दिनेश टेंभुर्णे, योगेश लाकडे, गुरू नानक ढोरे, वसीम शेख, विकास साजरे, प्रफुल्ल वाटगुरे, निकेश शेंदरे, मनन शेख, करपे, दांडेकर यांनी भाग घेतला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close