शेती विषयक

पाटसरितून होणाऱ्या पाण्याच्या नीचऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी – आरपीआय 

Spread the love
चांदूर रेल्वे / प्रकाश रंगारी 
                         अप्पर वर्धा कालव्याच्या पाटसरितून होणाऱ्या पाण्याच्या नीचऱ्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे.
               धामणगाव रेल्वे  तालुक्यातील झाडा येथे जामा मस्जिद ट्रस्ट चे वाहिवाटित  देवस्थान ची गट क्रं.१३४ ची ११ हेक्टर २९ आर शेतजमीन आहे. पण अप्पर वर्धा कालव्याच्या पाटसरितून होणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या नीचऱ्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या निचऱ्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि आजवर झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close