एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू
देवधर ( झारखंड)/ नवप्रहार मीडिया
वेगाने जात असलेल्या कारच्या चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन नदीत कोसळल्याने कार मध्ये बसलेल्या पाच लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात ऐक लहान मुलाचा समावेश आहे.
देवघरचे पोलीस अधीक्षक अजीत पीटर डुंगडुंग यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, प्रवास करताना पुलावरुन सिकटिया बॅराजमध्ये कार कोसळून हा अपघात झाला. वेगात आलेल्या कारने पुलावरुन जाताना रस्त्याच्या कडेला असलेले रोलिंग तोडले. त्यामुळे, बॅराजजवळी कॅनॉलमध्ये कार कोसळली, त्यामध्ये कारमधील ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात, एक लहान मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना बोलावण्यात आले, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कॅनॉलमधून कार बाहेर काढली, ती बोलेरो गाडी असल्याचे निदर्शनास आले.