विदेश

कोण होणारअमेरिकेचा अध्यक्ष ? ट्रम्प की हॅरीस

Spread the love

वॉशिंग्टन: / इंटरनॅशनल डेस्क

 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुक काही दिवसांवर येऊन राहिल्या आहेत. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे.

दोन्ही नेत्यांनी प्रचारात विजयासाठी कंबर कसून मेहनत घेतली आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी असताना सर्वेक्षणांमधूनही त्यांच्या निकटच्या लढतीचा अंदाज समोर आला आहे.

कमला हॅरिस 1 टक्क्याच्या आघाडीसह ट्रम्प यांच्या पुढे

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, कमला हॅरिस 1 टक्क्याच्या आघाडीसह ट्रम्प यांच्या पुढे आहेत. या सर्वेक्षणात 44 टक्के जनता हॅरिस यांना मत देण्याच्या विचारात असल्याचे दिसून आले, तर 43 टक्के लोक ट्रम्प यांना मत देण्याची शक्यता आहे. याचबरोबर सर्वेक्षणातून असेही दिसून आले की, कमला हॅरिस (50 टक्के) ट्रम्प (49 टक्के) यांच्यावर थोड्याशा फरकाने आघाडीवर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हॅरिस यांना 51 टक्के आणि ट्रम्प यांना 47 टक्के मते मिळू शकतात.

रोजगार आणि अर्थव्यवस्था मुद्द्यांवर अमेरिकन जनतेचा विचार

अर्थव्यवस्था, रोजगार आणि बेरोजगारी हे मुद्देही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरत आहेत. 47 टक्के अमेरिकन नागरिकांना ट्रम्प यांचा रोजगार व अर्थव्यवस्थेवरील दृष्टिकोन योग्य वाटत आहे, तर 37 टक्के लोकांच्या मते हॅरिस बेरोजगारीच्या समस्यांवर अधिक सक्षमपणे उपाययोजना करू शकतात असे म्हटले जात आहे.

भारतीय-अमेरिकन्सची पसंती कोण?

या निवडणुकांमध्ये भारतीय-अमेरिकन्स मतदारांचा कल हा महत्त्वाचा मानला जात आहे. एका अहवालानुसार, 10 पैकी 6 भारतीय-अमेरिकन कमला हॅरिस यांना समर्थन देत आहेत. या सर्वेक्षणात भारतीय-अमेरिकन्स मतदारांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थन कायम असले तरी, 2020 च्या तुलनेत ते कमी झालेले दिसते. यंदा 61% भारतीय-अमेरिकन मतदार हॅरिस यांना मतदान करणार असल्याचे माहिती मिळाली आहे, तर 32% मतदार रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांना पसंती दर्शवत आहेत.

स्विंग स्टेट्स या निवडणुकीतील महत्त्वाचे घटक ठरणार

स्विंग स्टेट्स या निवडणुकीतील महत्त्वाचे घटक ठरणार आहेत. अमेरिकेत सात स्विंग राज्ये आहेत, जिथे मतदारांचे कल अजून स्पष्ट नाहीत. या राज्यांतील निकाल शेवटी निवडणुकीच्या अंतिम निकालावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे या राज्यांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत निकराची लढत पाहता, स्विंग स्टेट्समधील निकालच या निवडणुकीच्या विजयाचे गणित ठरवतील, असे मत निवडणूक तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close