रक्षकच बनले भक्षक, अधिकाऱ्याने केली महिला कॉन्स्टेबल कडे शरीर सुखाची मागणी

मागील काही काळात महिलांवरील अत्याचारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कामकाजाच्या ठिकाणी तर सोडा महिला घरात देखील सुरक्षित नसल्याचे अनेक प्रकरणातून पाहायला मिळाले आहे. इथपर्यंत आपण समजू शकतो पण ज्या पोलिस विभागावर देशातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आहे त्या विभागात सुद्धा महिला सुरक्षित नसल्याचे पहायला मिळत आहे. चेन्नईत आपल्या पदाचा गैरवापर करत दोन महिला कॉन्स्टेबल चा लैंगिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूचे सहआयुक्त डी महेशकुमार यांच्याकडे सध्या उत्तर चेन्नई वाहतूक विभागाचा पदभार होता. याच विभागात काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांकडे डी. महेश कुमार यांनी शरीर सुखाची मागणी केली.
महिलांनी याकडे दुर्लक्ष केले पण त्यांनी वारंवार अश्लील संदेश आणि व्हिडिओ कॉल करुन त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर महिलांनी वैतागून डी.महेश कुमार यांच्याविरोधात तक्रार केली. यानंतर त्यांचे निलंबन केले.
आयपीएस अधिकाऱ्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोप झाल्यानंतर पोलिस विभागाने डीजीपी सीमा अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समितीची स्थापना केली होती. समितीने याचा तपास केला. हे प्रकरण इंटर्नल कंम्प्लेंट कमिटीकडे पाठवण्यात आलं. पीडित महिलांनी तक्रारीसोबत डी महेश कुमार यांनी केलेल्या अश्लील संभाषणाचे स्क्रीनशॉट्स पुरावे म्हणून सादर केले होते. यानंतर डी. महेश कुमार यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.