राज्य/देश

वाचा कुठे मतदार न फिरकल्याने निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी मांडली पंगत 

Spread the love

जळगाव / नवप्रहार डेस्क 

             निवडणूक म्हटले की कर्तव्यावर असलेले कर्मचारी फार दहशतीत दिसतात .जो पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत कर्मचारी मानसिक दबाबात असतात. पण जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल येथील मतदान केंद्रावर कर्तव्यावर असलेले कर्मचारी पंगतीत बसून जेवतांना दिसले. त्यामागे हे होते कारण 

या मतदार केंद्रावर ती मतदार फिरकले नाही . त्यामुळे निवडणूक आयोगाच्या लोकांनी पंक्तीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
राज्यभरात मतदानाचा उत्साह सुरू आहे. लोकांनी मतदान करावे यासाठी आज सुट्टी देखील दिलेली आहे. तसेच काही स्थानिक पक्षांकडून लोकांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये मतदार केंद्रावर मतदार न आल्याचे चित्र समोर आलेले आहे.

एरंडोल विधानसभा क्षेत्रातील वडगाव मतदान केंद्र क्रमांक 214 या ठिकाणी सकाळपासून मतदान करायला लोक आलेले नाही. तेथील काही लोकांनी सकाळी मतदान केले. परंतु त्यानंतर कोणीही आले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाची कर्मचारी कंटाळले आणि दुपारची वेळ झाल्यानंतर त्यांनी भूकही लागली होती. मतदार न आल्यामुळे त्या मतदान अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणीच जेवणाची पंगत पाडली.

मतदान केंद्रातून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. कर्मचारी मस्तपैकी बसून जेवत आहे. तसेच पोलीस कर्मचारी देखील या जेवणाच्या पंक्तीचा आनंद घेत आहेत. दुपार झाली तरीदेखील या गावातील अनेक लोकांनी अजूनही मतदान केलेले नाही.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close