एकलव्य अकादमी क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रासह संस्कार रुजविणार व्यासपीठ :- प्रकाश मारोटकर
एकलव्य क्रिडा अकादमीत युवा सप्ताह उत्साहात साजरा
नांदगाव खंडेश्वर/ प्रतिनिधी
आपला मुलगा इंजिनिअर डॉक्टर नाही झाला तरी चालेल पण संस्कारित युवक तयार झाला पाहिजे आणि तेच एकलव्य अकादमी क्रिडा व शिक्षण क्षेत्रासह संस्कार देण्याचं काम करीत असून आज मुलांना संस्कार देणे फार गरजेचे आहे हे पुण्याचं काम एकलव्य अकादमी करत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी केले ते स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित युवा सप्ताहात बोलत होते
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त १२ ते १८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन मागील २५ वर्षा पासून एकलव्य क्रिडा अकादमी युवा साप्ताह साजरा करीत असते या वर्षी एकलव्य संस्थेचा २५ वा वर्धापन दिन सुद्धा साजरा करण्यात आला यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मारोटकर पुढे बोलताना म्हणाले सर्व हल्ली पालकांचा कल आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले पाहिजे याकडे जास्त असून खरं शिक्षण आपल्या मातृभाषेत होणे गरजेचे आहे त्यासाठी आपला मुलगा मराठी शाळेतचं शिकला पाहिजे असे पालकांना आवाहन केले व एकलव्य अकादमी या संस्थेने २५ वर्ष वाटचाल करतांना सदानंद जाधव सरांना कसा संघर्ष करावा लागला व या लावलेल्या वृक्षांचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी आयुष्यात त्याग करत किती तप त्यांना करावा लागला असेही प्रकाश मारोटकर म्हणाले यावेळी जनता राजा या महानाट्याचे एकलव्य स्कूलच्या विद्यार्थ्यांनि सादरीकरण केले यावेळी व्यासपीठावर नाळ चित्रपटातील कलाकार श्रीनिवास पोफळे प्रा अधीर कडू पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता नागपुरे समाजसेवक उत्तमराव मुरादे पत्रकार मनोज मानतकर प्रा गजानन तर्हेकर उदोजग किशोर चकूले कृष्णा कापडेइत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य अकादमीचे संस्थापक सदानंद जाधव सर संचालन मुख्याध्यापक विलास मारोटकर यांनी केले व आभार व्यवस्थापक अनुप काकडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अमर जाधव महेंद्र मेटकर पवन जाधव व एकलव्य स्कूलचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले