धामणगाव रेल्वे /प्रतिनिधी
बदलापूर येथील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार तसेच राज्यात अनेक ठिकाणी महिला आणि तरुणी वरील अत्याचारात प्रचंड प्रमाणात वाढ़ झाल्याने महाविकास आघाडी कडून आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता.. पण उच्च न्यायालयाने या बंद वर आक्षेप नोंदविल्याने शहरात आज महाविकास आघाडी कडून शिवाजी चौक येथे काळ्या फिती लावून, तोंडावर काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन निषेध नोंदविला आहे.
बदलापूर येथील एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चिमुरड्यांवर करण्यात आलेले लैंगिक अत्याचार तसेच या घटने पाठोपाठ राज्यात इतर ठिकाणी घडलेक्या महिला आणि तरुणी वरील अत्याचाराच्या घटनामुळे राज्यात कायदा औई सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडी कडून आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. पण उच्च न्यायालयाने अश्या प्रकारच्या आंदोलन करता येणार नसल्याचे म्हटले आहे न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडी ने शांततेने आंदोलन करण्याचे ठरवले. आज महाविकास आघाडी कडून काळ्या फिती लावून आणि एका ठिकाणी बसून आंदोलन करम्यात आले.
धामणगाव शहरांत देखील माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक येथे आंदोलन करण्यात यावेळी सुरेश निमकर, श्रीकांत गावंडे, सच्चिदानंद काळे, नितीन कनोजिया नितीन देशमुख, अशोक कुचेरिया, सुधीर शेळके, ऋषिकेश जगताप, पंकज वानखडे, प्रदीप मुंदडा रमेश ठाकरे संजय शेंडे प्रशांत सबाने रवी भुतडा संजय तायडे चंदू डहाणे अतुल भोगे संतोष गावंडे सुनील भोगे संदेश कुचेरिया आशिष शिंदे मंगेश बोबडे विकी बोरकर नंदकुमार मानकर मंगेश ठाकरे हरिदास जुनघरे नाना केणे अमोल कडू नाना होनाडे,कल्पना गावंडे शेळके मॅडम, यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.