सामाजिक
आम्ही वाट पाहिन पण बसनेच जाईन !
महिला प्रवाशांची झुंबड
अर्ध्या तिकीट दराने प्रवास महिला वर्ग आंनदात
आर्वी प्रतिनिधी:-नुकताच महाराष्ट्र शासनाने एसटीच्या प्रवासामध्ये महिलांना तिकीट दरात 50% टक्के सवलत दिल्याने महिला वर्ग खूश असुन परगावी जातांना आम्ही वाट पाहिन,परंतु बसनेच बाहेरगावी जाईन असा सूर शहरी व ग्रामीण भागातील महिलामधून आता ऐकावयास येत आहेत.
या सवलतीमुळे महिलांचा एसटीने प्रवास करण्याचा ओघ प्रचंड वाढला असुन महिला प्रवाशामुळे साप्रंत स्थितीत हाऊस फूल होत आहेत. दरम्यान शासनाने महिला प्रवासामध्ये दिलेल्या पन्नास टक्के सवलती मुळे खासगी वाहन व्यवसायाला मात्र मोठा आर्थिक फटका बसला असुन खाजगी वाहन व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
शासनाने यापूर्वी 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासामध्ये तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी 75 वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांना मोफत एसटी प्रवासाची योजना सुरू केली तर सध्या महिला सन्मान योजनेअंतर्गत सरसकट महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत योजना सुरू करून त्वरित या योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरू केली आहेत, त्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहेत. यापूर्वी परगावी प्रवास करतांना बस न आल्यास बहुतांश महिला मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करित होत्या. तदवतच यापूर्वी खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिला आता एसटी बसमधून प्रवास करतांना दिसून येत आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीला अपेक्षित प्रवाशी मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. महिलांचा प्रतिसाद कमी झाल्याने खासगी वाहतुकीची गाडी वेळेवर सुटत नाही. प्रवाशांनी गाडी वेळेत भरत नाही, केवळ पुरुष प्रवाशांच्या भरशावर हा परिवहनाचा व्यवसाय करणे म्हणजे दिवसाला खाजगी वाहतुकीची एक फेरी पुर्ण होणे, आता अशक्यप्राय झाले आहेत. महिला आता मात्र एसटी प्रवासालाच पसंती देत आहेत ,परिणामी यापूर्वी बसची प्रतिक्षा करण्यास कंटाळा करणाऱ्या महिला आता वाट पाहिन,पण एसटीनेच प्रवास करील,असे म्हणतांना दिसून येत आहेत. त्यामुळे बसस्थानक महिला वर्गानी प्रचंड भरलेली दिसून येत असुन पुरुषांची गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहेत.
महाराष्ट्र शासनाने एसटी च्या प्रवासामध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सुट दिली, हा स्वागतार्ह निर्णय आहेत. परंतु सुशिक्षित बेरोजगार व कष्टकरी पुरुषांना, तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकांना सुध्दा एसटी च्या भाड्यात किमान 75%टक्के सुट दिली पाहिजे होती. तसेच जे श्रीमंत गटात असणाऱ्या व्यक्ती किंवा महिला यांना सरसकट सवलती देऊ नयेत, कारण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचा सर्वकष विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहेत.अविनाश टाकेआर्वी सामाजिक कार्यकर्ते
महाराष्ट्रात एसटी चे जाळे प्रचंड प्रमाणात विस्तारलेले आहेत. आम्ही महिला वर्ग आधी खाजगी वाहनाने प्रवास करीत होतो, मात्र आता महाराष्ट्र शासनाने बसच्या प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के सुट दिली, त्या बद्दल शासनाचे आभारी आहोत. परंतु श्रीमंत व आर्थिक दुष्टीने प्रबळ असणाऱ्या नौकरदार महिला वर्ग,यांना सुट द्यायला पाहिजे नव्हतीच. त्याऐवजी शेतकरी, कष्टकरी, श्रमिक ,बेरोजगार यांना एसटी च्या भाड्यात सुट द्यावी, असे माझे वैयक्तिक मत आहेत.निलिमा सुरेंद्र गोठाणेसामाजिक कार्यकर्तीआर्वी
——————————–