सिंदी रेल्वे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजीस्टिक पार्क च्या रेल्वे इंजिनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविली हिरवी झेंडी
लॉजीस्टिक पार्क च्या रेल्वे परिचालन परीक्षण च्या इंजिनाला दाखविली हिरवी झेंडी
प्रतिनिधि
आशिष इझनकर
– वर्ध्याच्या सिंदी रेल्वे येथील मल्टी मॉडेल लॉजीस्टिक पार्कचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे, या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री वर्ध्याच्या सिंदी रेल्वे येथील लॉजीस्टिक पार्क परिसरात दाखल झाले आहे. सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेल्वे इंजिनाला हिरवी झेंडी दाखवून रेल्वे परिचालन परीक्षण करण्यात आले आहे. मल्टी मॉडेल लॉजीस्टिक पार्क साठी उभारण्यात आलेल्या रेल्वे लाईन आणि यासाठी असलेल्या इंजिनला हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहेय. यादरम्यान खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, आमदार समिर कुणावर, आमदार दादाराव केचे, लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनिल गफाड, भाजप प्रदेश सचिव राजेश बकाने देखील उपस्थित आहेत. रेल्वे परिचालन परीक्षण यावेळी करण्यात आले आहे.