“वरुड बघाजी धरणातील बेटावर अवैध गावठी दारू हातभट्टीवर रेड 1,62,500/- रू चा मुद्देमाल जप्त
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर हद्दीतील मौजा चीचपूर, शिदोडी शेत शिवारातील वरुड बघाजी धरणात आत मध्ये बेटावर काही इसम घरगुती वापराचे सिलेंडर व शेगडी सह गावठी हातभट्टी दारू गाळत आहेत अशा गोपनीय खबरे वरून पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर यांनी पंच व पोलीस स्टाफसह दिनांक 17/6/23 चे रात्री रात्रोला सापळा रचला. वरुड बघाजी धरणाचे काठावरून आत मध्ये एक ते दीड किलोमीटर पायी व नंतर धरणामध्ये बोट/नावे च्या साह्याने धरण क्षेत्रात जात असताना पोलिस आल्याची चाहूल लागताच दोन इसम बेटावरून पाण्यातून पळून गेले. रात्रोला बेटावर जाऊन पाहणी केली असता दोन लोखंडी शेगडी वर दोन ड्रम ठेवून गावठी हातभट्टी दारू गाळताना दिसून आली. घटनास्थळावरून 1) HP कंपनीचा गॅस सिलेंडर, 2) दोन लोखंडी शेगडी 3) 3 प्लास्टिक ड्रम मध्ये मोहामाच सडवा, 4) 1 लोखंडी ड्रम शेगडीवर ठेवून दारू गाळणे सुरू असलेला मोहामाच सडवा 5) एक लाकडी बोट वर ठेवून असलेल्या 3 प्लास्टिक डबक्या ज्यामध्ये 140 लिटर गावठी दारू गाळून असलेली, 6) बेटावर जाण्यासाठी वापरात असलेली लाकडी बोट, 7) 2 जर्मन मोठे घमिले व दारू गळण्याचे साहित्य *असा एकूण 1,62,500/- रु चा गावठी दारू* गाळण्यासाठी वापरलेला मुद्देमाल पंचनामा कारवाईप्रमाणे जप्त केला. वरुन फरार आरोपी अविनाश पचारे व त्याचा साथीदार यांचे विरुद्ध पो.स्टे.मंगरूळ दस्तगीर येथेअपराध क्रमांक 313/2023 कलम 65 (फ)(क)(ड) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार सुरज तेलगोटे, नापोशी नरेश कोलामी, सुनील उडाके, पोशी अमोल हिवराळे, जिवन लांडगे, यांनी केली.