वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुढाकार
सुरक्षित विद्यार्थी, प्रकाश निखारे यांचे प्रबोधन / मार्गदर्शन
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : नुकत्याच झालेल्या वाहतूक विभागाच्या वतीने वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी नियमांचे अंमलबजावणी होण्यासाठी असा संदेश देत वर्धा वाहतूक विभागाद्वारे १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीला रस्ता सुरक्षा सप्ताह राबवण्यात आला . या अभियानाअंतर्गत वाहतूक पोलिसांनी विविध कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यात आल्या . चालकांच्या सुरक्षेसाठी दरवर्षीप्रमाणे वर्धा वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमात कन्नमवार विद्यालयातील शिक्षक प्रकाश निखारे यांनी रस्त्यावरील अपघाताची संख्या कमी होऊन त्यामध्ये मृत्यू व जखमींची होण्याच्या घटना घडू नयेत यासाठी प्रबोधन केले .यात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये मॉडेल महाविद्यालय आर्वी मधील कु.रेवती श्रावण लांजेवार द्वितीय पारितोषिक, तर निर्मल अनामत देवघरे ,राखी पुरुषोत्तम बिडकर यांना प्रोहोत्संपर बक्षीसे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो.समीर याकूब व मोटार वाहन अधिकारी अजय चौधरी यांचा हस्ते पारितोषिक देण्यात आला .सहभागी विजेते ठरणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आली.