सामाजिक
विदर्भ निर्माण महामंचाकडून आशिष इझनकर वर्धा लोकसभेसाठी मैदानात

वर्धा / निलेश खारोडे
वेगळ्या विदर्भासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विदर्भवादी संघटनांचा लढा सुरू आहे. पण आजही त्यांना यश आलेले नाही. असे असतांना देखील या संघटनांनी आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेत लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचे ठरवले आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातून विदर्भवादी नेते आशिष इझनकर यांना मैदानात उतरवले आहे.
काही वर्षांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी घेऊन समोर आलेल्या अनेक पक्षांना वेगळ्या विदर्भाचा विसर पडला आहे. परंतु आजही काही संघटना अश्या आहेत ज्या पृथक विदर्भाच्या मागणीवर ठाम आहेत. आणि यासाठी अनेक संघटनांनी एकत्र येत विदर्भ महामंच संघ तयार करण्यात आला. आणि या संघटनेने विदर्भात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.
11 जिल्ह्यांचा विदर्भ हा सीपी अँड बेरार प्रांताचा भाग होता.पण विदर्भ प्रदेशाला महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेने काय दिले? हा प्रश्न अजूनही विदर्भ आणि विदर्भातील जनता विचारते आहे. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी सुरू आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या संघटना आता एकत्र आल्या आहे आणि या संघटनांचा विदर्भ निर्माण महामंच हा संघ तयार झालाय. विदर्भातील विविध लोकसभा जागांवर आपले उमेदवार देण्याचा प्रयत्न या विदर्भ निर्माण महामंचकडून होतोय.
अँकर – वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी कित्येक वर्षापासून आंदोलनातून मागणी लावून धरणाऱ्या संघटनानी एकत्र येत विदर्भात विदर्भ निर्माण महामंच या तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे. हा महामंच वेगळ्या विदर्भासाठी लोकसभा निवडणूक लढत आहेय. ठिकठिकाणी उमेदवार देऊन वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. वर्ध्यात विदर्भवादी आशिष इझनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वर्ध्याच्या दत्तपूर येथे झालेल्या बैठकीत इझनकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
मागील दहा वर्षांपासून इझनकर आहेत जनतेच्या सेवेत – आशिष इझनकर हे वर्धा आणि विदर्भातील जनतेसाठी 10 वर्षापासून सतत आंदोलन उपोषण आणि निवेदनातून
जनतेच्या मागण्या रेटून धरत त्यांना न्याय मिळवून देत आहेत. दहेगाव येथे अलीकडे झालेल्या रेल्वेच्या थांब्यासाठीच्या आंदोलन गेल्या काही दिवसात चर्चेत आले.
निवडून दिल्यास जनतेसावे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य – इझनकर
ग्रामीण जनतेला विदर्भ राज्य आघाडीचे नेतृत्व पटले आहे.असे अनेक आंदोलनातून दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू हिंगणघाट आर्वी पुलगाव आणि देवळी या भागात विदर्भ राज्य आघाडीची चांगली पकड आहे दुसरीकडे मधुसूदन हरणे काशीकर ताई यांच्या रूपात विदर्भाचा मुद्दा वर्ध्यात सतत गाजत आला आहे. जनतेने माझे कार्य पाहून मला निवडून दिल्यास त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरण्याचा प्रयत्न माझा प्रयत्न असेल.