महिला अत्याचार अंबानगरी युवतीसेना आक्रमक.. !
युवतीसेना जिल्हाप्रमुख पियुशिका मोरे यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व डि.सी.पी.साळी साहेब समक्ष वाचला युवतीवर,होनारया अत्याचाराचा पाढा...
अमरावती / प्रतिनिधी
शहरात गेली काही दिवसान पासून शालेय,महावीद्यालयीन,परिचारिका, शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेञा मध्ये काम करणाऱ्या महीला भगीनीनवर माणसीक,शारीरीक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, या बाबत अमरावती युवतीसेनेनी या अत्याचार विरोधा मध्ये जन जागृती मोहीम राबवली असता,अंबानगरीतील युवती,व महीला भगीनी नशिखांत घाबरलेली असल्याची आपबीती युवती सेने समोर आली आहे,या बाबत युवतीसेनेनी पाठपुरावा केला असता गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये आरोपी द्वारे सर्वात जास्त मुलींची छेडखानी करूण छेड़खानी बाबत त्या मुलीने स्वताच्या परिवाराला या बाबत कुठलीही वाच्छता केली,असता, सबंधीत आरोपीने त्या अबला मुलीचे अभ्रूचे लक्तरे वेशिवर टांगून त्यांच्या सह त्यांच्या परिवाराला जिवे मारण्याची धमकी देऊन हल्ले केल्याचे भयान वास्तव चौकशी दरम्यान समोर आलेआहे,या बाबत अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची युवतीसेना जिल्हाप्रमुख यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालय येथे युवतीसैनीकांसह रितसर भेट घेऊन पोलीस यंञनेला विश्वासा मध्ये घेऊन या वाढत्या अत्याचार घटनेला पुर्णता आटोक्यात आणायच्या आगावू सुचना दिल्या..तसेच
या नंतर जर ही अत्याचाराची मालिका अशीच सुरू राहली,आणी अंबानगरी मधल्या युवतिंचे माणसीक,शारीरीक शोषण अश्या अपराध्यान कडून सर्हास होत राहले तर अंबानगरी युवतीसेना भर रस्त्यावर येऊन या अपराधी रोडरोमीयोंची धिंड काढेल व,या बाबत शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित झाली तर याला जबाबदार स्थानीक प्रशासन जबाबदार राहतील असा गर्भित इशारा देखील दिला…यावेळी युवती जिल्हाप्रमुख पियुशीका मोरे यांच्या सह प्रांजली कुलट विधानसभा प्रमुख, मुक्ता ढेरे,मनाली मुळे,उपशहर प्रमूख, आस्मा शेख,शलाका ठाकरे, अंजली वानखडे,यां सह शेकडो अंबानगरी युवतीसेनेच्या रणरागीनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.