वंचित बहुजन आघाडी दवलामेटीशाखा पदाधिकारी प्रवीण अंबादे चा घरी चोरी!
वाडी प्र
वाडी पोलीस स्टेशनं अंतर्गत येणारा आठवा मैल येथे चोरीचे प्रमाण अत्याधिक वाढले आहे. आठवडी बाजारातून लोकांचे मोबाईल, गाडी नेहमी चोरीला जाते. काही दिवसा अगोदर घरा समोर उभी दुचाकी चोरीला गेली होती आता तर चक्क रात्रीला घरात शिरून मुख्य दराचा ताला तोडून आलमारी तुन रोख रक्कम व दागिने अग्यात चोरांनी लमपास केल्याने भीती चे तसेच असुरक्षेचे वातावरण परिसरात पसरले आहे.
फिर्यादी वंचित बहुजन आघाडी दवलामेटी शाखा पदाधिकारी प्रवीण अंबादे यांचा राहते घरी बुधवार चा रात्री चोरी झाल्या ने परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फिर्यादी प्रवीण अंबादे यांनी दिलेल्या माहिती नुसार 17 तारखेला रात्री नऊ नंतर घरातील सर्व झोपले होते. सकाळी प्रवीण ची पत्नी शुभांगी सहा चा सुमारास उठली असता नेहमी कुलूप असणारा खोलीचा दार उघडा दिसला आत डोकावून पाहिले असता खोलीत कोणीच नव्हते आलमारी उघडी होती सामान अस्तव्यस्त पडून होते शुभांगी ने आरडा ओरड केला असता प्रवीण व त्याची आई धावत तिथे आली ती खोली व आलमारी आई वापरायची आई ने वस्तू तपासले असता चोरी झाल्याचे समजले. दोन सोन्याचे गोप 12 ग्राम व 20 ग्राम, दोन सोन्याचा अंगठी 3ग्राम व 4ग्राम. आणि रोख 60 हजार चोरी झाले.
प्रवीण ने त्वरित वाडी पोलीस स्टेशनं ला जाऊन अग्यात चोरा विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला पुढील तपास वाडी पोलीस स्टेशनं चे पी आय प्रदीप रायणवार साहेब करीत आहेत.