सामाजिक

निवासी शाळेचा उपक्रम वृद्धाश्रमात व बालगृहात रक्षाबंधन

Spread the love

 

राजेश सोनुने तालुका पुसद प्रतिनिधी ।

पुसद श्रावण महिन्यात येणारा महत्वाचा बहिण भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण सामाजिक न्याय विभाग अंतर्गत अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा आसरपेंड येथील मुलींनी ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रम व स्व. विद्यारतन वडते बालगृह जवाहर नगर धुंदी येथे दि.३० ऑगस्ट २०२३ रोजी अनाथ बालकांना व वृद्ध बेघर व्यक्तीना राखी बांधून साजरा केला.रक्षाबंधन हा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटा भोवती राखी म्हणजे एक पवित्र व आकर्षक धागा बांधतात,ही राखी त्यांच्या भवांकडून त्यांचे रक्षण करावयाचे प्रतिक मानले जाते. शाळेच्यावतीने रक्षाबंधन सणानिमित्त राखी तयार करणे हा उपक्रम राबविण्यात आला होता. नजीकच्या वृद्धाश्रमाला व बालगृहाला भेट देऊन लहान मुलांना राखी बांधण्यात आले.त्यांना फराळाचे व फळाचे वाटप करण्यात आले.सदर उपक्रमासाठी समाज कल्याण यवतमाळचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सविता घरजारे यांच्या कल्पेनेतून व अधीक्षका रेणुका बोनतावार यांच्या समवेत शिक्षक पियुष नाईक, संदीप चव्हाण,मनीषा अमृते,दिनेश पवार,मंगेश लंबे तसेच प्रज्ञा लढे हे उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close