सामाजिक

पातुर येथील अपघाताची आमदार वसंतजी खंडेलवाल यांनी घेतली तातडीने माहिती…

Spread the love

खबरदारीच्या उपाययोजना वाढविण्याचे महामार्ग अधिकाऱ्यांकडे निर्देश…

अकोला : अकोला- वाशिम मार्गावर शुक्रवारी दुपारी पातुर नजीक झालेल्या भीषण अपघातानंतर आमदार वसंतजी खंडेलवाल यांनी तातडीने या अपघाताची माहिती घेऊन महामार्ग अधिकाऱ्यांना घटनास्थळावर भेट देण्याचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आणखी काही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.अकोला -वाशिम मार्गावर शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दोन चार चाकी गाड्यांचा समोरासमोर अपघात झाल्याने या अपघातात शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईकजी यांच्या पुतण्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार वसंतजी खंडेलवाल यांनी ताबडतोब पातुरचे ठाणेदार श्री शेळके यांच्याशी संपर्क साधून घटनेची पूर्ण माहिती जाणून घेतली. महामार्गावर काही ठिकाणी चुकीच्या दिशेने वाहने येत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताबडतोब महामार्गाचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री जवादे यांना याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आवश्यक तेथे कट देऊन चुकीच्या मार्गाने वाहने रस्त्यावर येणार नाहीत यासाठी आणखी काय करता येते याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार खंडेलवाल यांनी. याप्रसंगी केल्या. श्री जवादे लवकरच या संदर्भात योग्य ती कार्यवाही करणार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close